महाराष्ट्रात दिवाळीच्या सुमारास पडणारी थंडी, आठवडाभर आधीपासून सुरु झालेले फराळाचे पदार्थ, खरेदी, वसु बारसेला घरात लागलेला कंदील, नरक चतुर्दशीला पहाटेची लगबग, उटण्याचा घमघमाट, अभ्यंगस्नान, सोबतीला आपलं आवडतं संगीत आणि घरच्या फराळाची चव चाखत दारासमोर घातलेली रांगोळी…
सणासुदीच्या अशा मंगल वातावरणाचा एकत्र अनुभव घेऊन या दिवाळीचा आनंद आपण द्विगुणीत करणार आहोत.
गेले तीन महिने आपले हौशी गायक आणि वादक सभासद मित्र मैत्रिणी कसोशीने कार्यक्रमाची तयारी करीत आहेत. त्यांच्या या मेहनतीला दाद द्यायला आपण सगळे जमणार आहोत,
सिंगापूर पॉलीटेक्निकच्या सभागृहात सकाळी ठीक ९ वाजता,
'दिवाळी प्रभात - महाराष्ट्राचा सांगीतिक प्रवास' या कार्यक्रमासाठी.
तारीख: २२ ऑक्टोबर (Deepavali Public Holiday)
यावेळी आपण फराळ पाककला स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. यात एक गोड आणि एक तिखट फराळाचे पदार्थ घरून करून आणणे अपेक्षित आहे. चवीव्यतिरिक्त पदार्थांच्या आकर्षक मांडणीसाठीही गुण देण्यात येतील. त्याचबरोबर कंदील बनविण्याची स्पर्धाही आयोजित केली आहे. जसा तुमच्या मनात असेल तसा कृपया तयार करून आणा, विषयाची काहीही मर्यादा नाही. वयोगट ५ ते १४ वर्षे आणि १५ वर्षांच्या वर.
---------------------------------------------------------------------------
Happy to announce one of the most sought after events of MMS, 'Diwali Prabhat - Musical Journey of Maharashtra'. This is a musical program encompassing Abhangs, Natyageete, Bhaavgeete and works of Pt HridayNath Mangeshkar, Sudhir Phadke & the likes and of course, Sunidhi Chauhan as well.
Date: 22 Oct 2014 (Deepavali Public Holiday)
Time: 9am - 1230pm (including lunch)
Venue: Singapore Polytechnic Auditorium (right outside Dover MRT Stn)
Looking forward to meeting all of you there!
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699