ऋतुगंध - मराठी द्वैमासिक (Rutugandha - Marathi BiMonthly Periodical)

"वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशीर" या सहा ऋतूत सहा अंक प्रकाशित करावेत. पर्यावरणाला अनुकूल आणि जगभर सहजगत्या उपलब्ध असावेत, या विचारातून "ऋतुगंध" या आमच्या "ई -द्वैमासिकाचा" जन्म झाला. लेख, कथा, कविता, खास बालांसाठी अशा लिखाणाबरोबरच मंडळातील घडामेडी, आगामी कार्यक्रमांची माहिती असं सर्व आपल्याला या नियतकालिकात दिसेल. जरूर वाचा.

सर्वात ताजा अंक व मागील अंक ब्लॉगवर वाचा : http://rutugandha-mms.blogspot.sg/

ऋतुगंध संपादन समिती २०२०

आपली यावर्षीची ऋतुगंध संपादन समिती याप्रमाणे असेल:

  • संपादिका - जुईली वाळिंबे  
  • सहाय्यक संपादिका - दीपिका कुलकर्णी
  • जनसंपर्क - यशवंत काकड
  • ब्लॉग संयोजक - दीपिका कुलकर्णी
  • सहाय्यक - अजिंक्य ढवळे
  • कार्यकारिणी संयोजक - सचिन जंगम

ऋतुगंध कॅलिडोस्कोप - “केल्याने देशाटन” विशेषांक

नमस्कार मंडळी,

ऋतुगंधच्या नवीन पर्वात आपले मनःपूर्वक स्वागत!

मंडळी, २०२० हे वर्ष आपल्यासाठी covid १९ चे अकल्पित संकट घेऊन आले, आपण अजूनही त्या आव्हानाला तोंड देत आहोत, सर्किट ब्रेकर च्या फेऱ्यातून बाहेर येण्यात कदाचित हे वर्ष निघून जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंडळ सिंगापूर देखील मोठ्या कल्पकतेने विविध कार्यक्रमांची रूपरेषा आखत आहे. काही दिवसांनी गजाननाचे आगमन होईल. विघ्नहर्त्याच्या कृपेने आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू अशी आशा व्यक्त करतो.

मंडळी, हे वर्ष काहीसे वेगळे आहे, आपल्या अव्याहत धावणाऱ्या आयुष्यात एक प्रकारचा खंड पडला आहे. थोड्याश्या निराशेच्या, भविष्याविषयी साशंक असलेल्या मनस्थितीत आपले ऋतुगंध हे द्वैमासिक सगळ्या विवंचनांमधून काही काळ का होईना एक सुखद अनुभव देईल.

या वर्षीच्या ऋतुगंधची संकल्पना असणार आहे “कॅलिडोस्कोप”

कॅलिडोस्कोप

आपलं आयुष्य आणि व्यक्तिमत्व विविध गोष्टींनी समृद्ध होते. निसर्ग, विविध अनुभव, संगीत, वाचन, प्रवास, माणसं, कल्पनाशक्ती, उत्तम कलाकृती, पदार्थाची चव, नाती या आणि अनेक तत्वांनी आपल्या व्यक्तिमत्वाला एक परिपूर्णता येत असते. कॅलिडोस्कोप म्हणजे विविध काचांनी तयार होणारा सुरेख आकृतिबंध, तसेच आपल्या आयुष्यातल्या विविध तत्वांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक आकृतिबंध तयार होतो. एक सुंदर चित्र, त्यात विविध रंगांची , आकाराची भर पडत जाते. आपलं आयुष्य हेच या विविध अनुभवांचा कॅलिडोस्कोप नाही का !

आपले आयुष्य सुंदर करणाऱ्या विविध पैलूंचे चार विशेषांक या वर्षी आपण करणार आहोत.

पहिला विशेषांक असणार आहे “केल्याने देशाटन”

या वर्षी आपण सर्वात जास्त काय मिस करत आहोत. तर अर्थातच प्रवास. यापूर्वी आपण प्रवास करत होतो हे देखील आता आपल्याला काल्पनिक वाटू लागले आहे. जवळजवळ गेले चार ते पाच महिने आपण घरात आहोत. या कालावधीत खरं तर आपण एखादी तरी ट्रिप करतोच, किंवा निदान भारतात एक फेरी असतेच. पण हे वर्षच काहीसे वेगळे असल्यामुळे आपल्याला या आनंदाला मुकावे लागतेय. हरकत नाही, आपण घर बसल्या छान सफर करू शकतोच की. कशी? अगदी सोप्पे आहे, तुमचा एखादा अविस्मरणीय प्रवास आठवा आणि त्याचे छान वर्णन करणारा एक लेखआम्हाला लिहून पाठवा. त्यात उत्तमोत्तम फोटोंची रेलचेल असली तर अजूनच छान.

लेखात अभिप्रेत असणाऱ्या काही गोष्टी -

  • प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव
  • तिथली वैशिष्ट्ये अधोरेखित करणारी छायाचित्रे
  • लेखकाचे छायाचित्र
  • लेखात त्या ठिकाणचे महत्व, तिथली भाषा, तिथली संस्कृती, पदार्थ, माणसं यांचा उल्लेख असावा (छायाचित्राच्या खाली नाव लिहून पाठवावे, उदा. पदार्थ)

आपण आपल्या तरुण पिढीसाठी एक छोटीशी सवलत देत आहोत. आपली तरुण पिढी, ज्यांचे शिक्षण मातृभाषेत झाले नाही , त्यांनी आपला लेख हा “vlog” च्या स्वरूपात पाठवला तरी चालेल. फक्त त्या Vlog ची भाषा मराठी हवी. या vlog मध्ये आपण स्वतः या ठिकाणाबद्दलच्या गमतीजमती सांगू शकता तसेच आपण काही videos केले असतील तर त्यातले काही ऍड करू शकता . उद्देश हाच कि मराठी लिखाण येत नसले तरी आपल्या तरुण पिढीला नक्कीच छान मराठी बोलता येते,. आणि त्यांनी ही या अंकात आपले योगदान द्यावे, ही इच्छा!

तसेच आपल्याला काही सदर सुरु करायचे असेल तर कृपया संपर्क साधावा, बाकी आपल्या कविता जरूर पाठवाव्या. कविता आणि सदर याना विषयाचे बंधन नाही.

आणि हो, आपल्या छोट्या दोस्तांसाठी एक छान आयडिया, दोस्तांनो तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा, अर्थात मराठीत, गोष्ट कुठलीही चालेल, अगदी तुम्ही स्वतः रचलेली असेल तरी, विषय - कोणताही मग तो सुपरहिरो असेल किंवा गणपती बाप्पा.

पहिल्या विशेषांकासाठी लेख, vlog, आणि ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवण्याची अंतिम तारीख - १५ सप्टेंबर २०२०.

आपण आपले लेख, vlogs आणि ऑडिओ रेकॉर्डिंग rutugandha@mmsingapore.org या संकेतस्थळावर पाठवू शकता.

सस्नेह,
ऋतुगंध संपादन समिती

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software