गणपतीची देणगी इथे द्यावी CLICK HERE for MMS Ganeshotsav '25 Donation
नमस्कार मंडळी,
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचा गणेशोत्सव आपल्यासाठी खास असणार आहे!
आपण सर्वजण लवकरच एकत्र येणार आहोत लिटल इंडिया येथील खुल्या प्रांगणात (2 OWEN ROAD, Farrer Park, Singapore 218842) — आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी!
गणेशोत्सव मंडळासाठी फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही फारच महत्त्वाचा असतो.
तिकीटविक्री, जाहिराती आणि आपल्यासारख्या सभासदांकडून मिळणाऱ्या ऐच्छिक देणग्या — या सर्वातून मंडळाचा मोठा आर्थिक भार हलका होतो आणि वर्षभराचे उपक्रम शक्य होतात.
खुल्या मैदानावरील आयोजनामुळे खर्च वाढणार हे जरी खरे असले, तरी कार्यकारिणीचा प्रयत्न आहे की आपल्या सर्वांच्या आनंदात आणि सहभागात कोणतीही कमतरता भासू नये.
म्हणूनच आपण सर्वांनी मिळून, आपली साथ देत, हा आर्थिक भार थोडा हलका करावा ही विनंती.
आपण आपल्या क्षमतेनुसार ऐच्छिक देणगी देऊन यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवू शकता. देणगीसाठी ई-मेलमध्ये दिलेले पर्याय वापरून सहज ऑनलाईन योगदान देता येईल.
देणगीसाठी:
1. Pay using this UEN: S94SS0093G
2. Pay using this QR Code:
3. Account transfer to DBS Bank
Account #: 0019044375
Account Type: Current Account
Account Holder's Name: Maharashtra Mandal (Singapore)
Subject: GE8 Ganeshotsav Donation
4. Use other payment options using the following link
लवकरच गणेशोत्सवाची आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची पत्रिका आपणास शेअर करण्यात येईल.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
गणरायाच्या चरणी हे आयोजन यशस्वी होवो हीच प्रार्थना!
सस्नेह,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणी
विद्येचे दैवत आणि विविध कलांचा अधिष्ठाता असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आपण दरवर्षी जल्लोषात आणि कलात्मक सादरीकरणातून करत असतो.
यंदाही महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्या सर्व कलारसिक सदस्यांसाठी घेऊन येत आहे एक खास संधी—"बाप्पाच्या मांडवात कलांची आरास!"
गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत दररोज वेगवेगळ्या कलाप्रकारांचं प्रदर्शनी रूपाने सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये चित्रकला, छायाचित्रण, हस्तकला, सुलेखन आणि आपल्या बाल कलाकारांनी बनवलेल्या गणेशमूर्ती यांचा समावेश असणार आहे.
तुम्हालाही तुमची कलाकृती ह्या अनोख्या प्रदर्शनात सहभागी करून घ्यायची असल्यास, कृपया लवकरात लवकर नावनोंदणी करा.
चला तर, आपली कला बाप्पाच्या चरणी अर्पण करूया आणि हा उत्सव अजून सुंदर बनवूया!
https://mmsingapore.org/event-6290748
*कार्यक्रमातील सहभाग, वेळापत्रक व इतर तपशील मंडळाच्या निर्णयानुसार बदलू शकतात. मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार मंडळास असेल.
म.मं.सिं. कार्यकारिणी
हार्मनी कप 2025 – चला सज्ज होऊया!
मंडळी,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यंदा आंतर-सोसायटी बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत आहे – आणि त्यासाठी, आपल्याला हवे आहेत आपले सर्वोत्तम, उत्साही आणि मनापासून खेळणारे खेळाडू!
ही एक फिरती चषक स्पर्धा आहे – सिंधी, गुजराती, मारवाडी आणि महाराष्ट्र मंडळामधे चुरशीचा, पण मैत्रीपूर्ण सामना होणार आहे.
ही केवळ एक स्पर्धा नाही, ही आहे आपल्या एकजुटीची, सळसळत्या उत्साहाची आणि क्रीडाप्रेमाची साक्ष!
जागा खूपच मर्यादित आहेत, त्यामुळे वेळ वाया घालवू नका – आजच आपले नाव नोंदवा.
आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी द्या – मैदानावर उतरा, मनापासून खेळा, आणि ह्या क्षणांचा आनंद लुटा.
Registration Link: https://mmsingapore.org/event-6239964
अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा.
Badminton
Venue-
KFF Badminton Arena, 100 Guillemard Road, Singapore 399719
20th July 2025
$20/ Participant/Category
(For Selected Participants)
Please note the following-
आपल्या जीवनातील सर्जनशीलतेचं, भक्तीचं आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक असलेल्या बाप्पाचं आगमन आपण दरवर्षी जल्लोषात आणि कलात्मक सादरीकरणातून करत असतो.
याच परंपरेला पुढे नेत, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यंदाही घेऊन येत आहे — "विविध गुणदर्शन २०२५ (VVG)" — आपल्या सर्वांसाठी एक बहुरंगी, बहुरूपी कला महोत्सव!
या वर्षीच्या VVG कार्यक्रमाची संकल्पना आहे —
प्रवास मराठी सिनेसृष्टीचा ….!
मराठी चित्रपटसृष्टीचा हा प्रवास म्हणजे केवळ चित्रपटांचा इतिहास नाही, तर आपल्या संस्कृतीचा, सामाजिक बदलांचा आणि भावनांचा प्रवास आहे. प्रत्येक युगाने आपल्याला काहीतरी दिलं आहे — सुरेल गाणी, ठसकेबाज लावण्या, लोककला, तरुणाईची धग आणि विचार करायला लावणारे संदेश.
तर मंडळी, ह्या रंजक विषयाला साजेसं सांघिक सादरीकरण आपल्याला करायचं आहे — नृत्य, नाट्य, संगीत, लघुनाटिका, इ.
तुम्ही कोणतंही युग निवडू शकता आणि त्या काळातली कला, भावना किंवा विशिष्ट शैली सादर करू शकता.
कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणेः
तारीखः 13 सप्टेंबर 2025 (शनिवार)
वेळः सायंकाळी ४.00 वाजता
स्थळः GIIS Punggol
• नृत्य, संगीत, वादन, किंवा इतर प्रकारचे सादरीकरण सांघिक असावे.
• सादरीकरण मराठी भाषेत असावे.
• संघ प्रमुखाने आपल्या सादरीकरणाची नाव नोंदणी 25 ऑगस्ट पर्यंत करावी (यात गाण्याचे/ नृत्याचे नाव, प्रकार, सहभागी कलाकारांची नावे आणि संख्या यांचा अंतर्भाव करावा).
• जर दोन संघ एकाच गाण्यावर सादरीकरण करणार असतील तर सगळ्यात आधी नोंदणी करणाऱ्या संघाला ती संधी दिली जाईल, आणि दुसर्या संघाला मंडळाकडून वेगळ्या गाण्यावर सादरीकरण करण्याची विनंती केली जाईल.
• आपल्या कलाप्रकारासाठी लागणारी वेशभूषा, वाद्यसंच किंवा ध्वनिचित्रमुद्रण त्या त्या कलाकाराने/संघाने घेऊन येणे अपेक्षित आहे.
• प्रत्येक संघाला आपली कला सादर करण्याचा अवधी 3 ते 5 मिनटे असेल.
• कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांनी मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे.
• वयमर्यादा - किमान 5 वर्ष
• आपल्या कार्यक्रमाची ऑडिओ फाईल 31 ऑगस्ट पर्यंत आमच्याकडे द्यावी.
• सहभाग व सादरीकरणासंबंधित कोणत्याही बाबतीत मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
चला तर मग, आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना रंगमंचावर खुलवायला सज्ज व्हा!
अधिक वाट न पाहता सहभागी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीशी संपर्क साधा आणि नाव नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
अक्षता मोडक - 81603668
सुचित्रा जंगम - 9272 4541
दीप्ती हिर्लेकर - 88760367
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699