साहित्य सहवास

साहित्याची रुची नसलेला मराठी विरळा. मराठी साहित्यप्रेमींची ही साहित्याबद्दलची असलेली आवड जोपासायला आणि वृद्धिंगत करायला मंडळाने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे - म. मं. सिं. साहित्य सहवास. ह्या उपक्रमांतर्गत आपण लेख, कथा, कविता अशा विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घेतो. यात स्वरचित तसेच प्रसिद्ध व प्रतिथयश लेखकांचे साहित्य सादर ऐकण्या वाचण्यासाठी महिन्यातून एकदा हा समूह भेटतो. 

Upcoming Sahitya Sahawas Events

    • Sat, January 25, 2025
    • 5:30 PM - 10:30 PM
    • 206 DEPOT ROAD #17-52 INTERLACE CONDOMINIUM, SINGAPORE 109697
    • 20
    Register


    शब्दगंध जानेवारी २०२५

    आमंत्रण 


    नमस्कार मंडळी,

    वर्ष २०२५ करता अनेक शुभेच्छा..

    या वर्षी शब्दगंध विशीत प्रवेश करत आहे. 

    २०२५ नव वर्षात आपण सर्वांनी प्रवेश केला. समारंभ पूर्वक नववर्षाचे स्वागत ही केले. पण जर उगवणारा सूर्य तोच होता. वेळेचे चक्र तेच होते. मग फरक काय होता.

     २०२५ चे  वेगळेपण आपण घडवायचे आहे. नवं संकल्प मनात धरून. नव कल्पना निर्माण करून. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन. जिवाभावाच्या मंडळींबरोबर मराठीत गप्पा करून. 

    जानेवारी महिन्याचे शब्दगंध म. मं. सिगापूर आयोजित आहे. आपली हजेरी जरूर कळवावी.

          

    नवं वर्ष प्रवेशाकरता कशाला अमली मद्य 

    साजरे करण्या श्रवण करावे मराठी पद्य   

    मनातले नवं संकल्प पुरे करू  

    मातृभाषेत संवादाची कास धरू        

    (प्रसिद्ध कवी न. व. कालचक्रे यांचे मनःपूर्वक आभार)


    वर्ष २०२५, जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांती व गणराज्य दिनानिमित्त आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा.....

    जानेवारी २०२५ महिन्याचे शब्दगंध मेहफिलीचे यजमानपद महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यांनी स्विकारले आहे.   

    ज्यांना प्रत्यक्ष कविता सादर करायची असेल त्यांनी स्वतःचे व सोबत येणाऱ्या व्यक्तीचे नाव कळवावे. यजमानांच्या आयोजना करता २३ जानेवारी २०२५ पर्यंत आपली नावे कळवावी ही विनंती. परदेशातून सहभागी कवी नेहमीप्रमाणे zoom वर कविता सादर करू शकतील. 

    पत्ता - 206 DEPOT ROAD #17-52 INTERLACE CONDOMINIUM, SINGAPORE 109697

    तारीख:  पंचवीस (२५) जानेवारी २०२५, शनिवार        

    वेळ : सायंकाळी ५ वाजता (ही वेळ सर्वांनी पाळावी ही आवर्जून विनंती) 

    विषय: 

    १. प्रवेश  ..... (यजमान सुचित विषय)

    २. सोबत जोडलेले चित्र..... (यजमान सुचित चित्र)

    सर्वांनी आपली उपस्थिती  ममसिं संकेत स्थळावर कळवावी ही नम्र विनंती.

    https://www.mmsingapore.org/event-6034287

    सस्नेह,

    म.मं.सिं. कार्यकारिणी


    • Sun, January 26, 2025
    • 4:00 PM - 5:00 PM
    • Online Via Zoom
    • 59
    Register


    करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन वेबिनार

    (Career Guidance and Counseling Webinar) 


    नमस्कार मंडळी,

    आपल्या आर्थिक नियोजनात आपण आपल्या मुलांसाठी उत्तम शिक्षणाची तरतूद करतो. 

    पण कोणतं शिक्षण त्यांच्यासाठी खरंच उत्तम आहे? त्यांचा कल, त्यांची आवड आणि मुख्य म्हणजे त्यांची ताकद कोणत्या क्षेत्रात आहे? 

    त्या क्षेत्रातील उत्तम शिक्षण मिळू शकतं अश्या संस्था/ विद्यापीठं कोणती आणि कुठे आहेत ? 

    त्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवायला काय प्रक्रिया आहे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतील. करिअर मार्गदर्शन   आणि समुपदेशन  हे ह्या सगळ्याचं  उत्तर आहे. 

    रोज बदलतं तंत्रज्ञान जगाला झपाट्यानं बदलत आहे. त्यामुळे  रोज नवनवीन करिअर्स आकार घेत आहेत अन  बरीच जुनी नाहीशी ही होत आहेत. ह्या सततच्या  बदलत्या चित्रात ‘करिअर काउंसेलिंग’ ही अत्यंत महत्वाची  आणि मोलाची भेट तुम्ही तुमच्या पाल्याला  देऊ शकता. 

    येत्या २६ जानेवारी ला दुपारी ४ वाजता (on 26th January 2025, @ 4pm) महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्यासाठी खास घेऊन येत आहे करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन ह्या विषयावर एक अत्यंत उपयुक्त माहितीपूर्ण  वेबिनार. 

    करिअर सारथी ही  मुंबई स्थित संस्था गेली अनेक वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित हि संस्था आपल्या साठी हा वेबिनार घेऊन येते आहे  ज्याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं  तुम्हाला मिळतील.  अंजली सरोगी , करिअर सारथी च्या संस्थापिका,  ह्यांनी आय आय एम अहमदाबाद मधून शिक्षण घेतलाय आणि त्या नॅशनल करिअर सर्विस (NCS) आणि  एशिया पॅसिफिक करिअर डेवेलोपमेंट असोसिएशन शी निगडित आहेत. 

    मुख्य म्हणजे, ह्या वेबिनारमध्ये सहभागी होण्याची संधी सर्व मुलांसाठी (सभासद आणि सभासेतर) उपलब्ध आहे. 

    This webinar is OPEN to all parents and the kids (members/non-members)

    तर भाग घेण्ययासाठी खालील लिंक वर आपली नाव नोंदणी करा आणि ह्या संधीचा फायदा घ्या.

    Registration link: https://www.mmsingapore.org/event-6034418 

    सस्नेह,

    म.मं.सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software