नमस्कार, एखाद्या पावसाळ्यातल्या दुपारी काय करावंसं वाटतं? असं विचारलं तर, हातात वाफाळत्या चहा किंवा कॉफीचा मग घेऊन, खिडकीपाशी बसून एखादं उत्तम पुस्तक वाचावंसं वाटतं असं उत्तर अग्रक्रमाने मिळतं. पुस्तकांची जादूच अशी असते. आपल्याला बसल्या जागी स्थळ-काळाचं बंधन विसरायला लावून वेगळ्या जगात घेऊन जाते. या वर्षीच्या 'जे जे उत्तम' या ५ सप्टेंबर २०१६ रोजी होणा~या गणेशोत्सवातील साहित्य-वाचनाच्या कार्यक्रमात आपण खरोखरच स्थळ आणि काळाचं बंधन तोडत ऐतिहासिक साहित्यामध्ये रममाण व्हायचं ठरवलं आहे. पुस्तकांविना इतिहास मुका असतो. त्या त्या काळातील लोकांनी लिहून ठेवलेल्या नोंदी असोत किंवा उत्खनन, संशोधन यामधून मिळालेले दुवे जोडत उभं केलेलं त्या काळाचं चित्र असो... ऐतिहासिक साहित्य वेगवेगळ्या भूमिका बजावत असतं. मानव-संस्कृतीचा प्रवास, समाजाची जडण-घडण, काही प्रेरणादायी घटना तर काही वेळा ज्यातून धडे घेऊन भविष्यात टाळले पाहिजेत असे प्रसंग आपल्याला इतिहासातून समजतात. मराठी साहित्यात पुरातन इतिहास, शिवाजी महाराजांचा काळ, पेशवाई, भारताचा स्वातंत्र्य-संग्राम आणि आधुनिक इतिहासातील महायुद्धे आणि युद्धे याविषयी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. शिवाय भाषांतरित पुस्तकांतून इतर देशांच्या रोचक इतिहासाविषयीही वाचण्यासारखे पुष्कळ साहित्य आहे. मग तुम्हाला आवडलेली अशीच एखाद्या काळाची सफर घडवण्यासाठी 'जे जे उत्तम' मध्ये जरूर सहभाग घ्या. काही महत्त्वाचे मुद्दे -
तर मंडळी, चला शोधून काढा तुम्हाला आवडलेले ऐतिहासिक साहित्यातले उतारे आणि आपली नावे नोंदवून टाका. सस्नेह, कार्यकारिणी २०१६
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699