सर्वप्रथम पुढील महिन्यातील दसरा-दिवाळी सणां निमित्त आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
'शब्दगंध' हा स्वरचित मराठी कवितांना वाहिलेला, गेली ११ वर्षं अव्याहत सुरू असणारा महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) चा मासिक उपक्रम आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण !
ऑक्टोबर २०१६ शब्दगंध चे सत्र एका विशेष कार्यक्रमाच्या स्वरूपात करण्याचे योजिले आहे. त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे व तसेच भारतातून विशेष पाहुणे मंडळी या सत्रात सहभागी होणार आहेत. ही मंडळी साहित्य अर्थात लेखन, कथाकथन व कविता या क्षेत्रांशी निगडित आहेत.
कार्यक्रमाची एकंदर आखणी पुढील प्रमाणे राहील :
तारीख : १५ ऑक्टोबर २०१६ - शनिवार वेळ : सायंकाळी ६ ते रात्री ९:३०स्थळ : "कॅरिबिअन काँडो फंक्शन रूम"
सर्वांनी बरोबर ६.०० वा वेळेवर उपस्थित राहावे अशी विशेष विनंती .
वेळापत्रक साधारण पणे असे राहील :
६.१५ ते ७.०० : शब्दगंधींचे कविता वाचन. प्रत्येकाने आपल्या यापूर्वीच्या शब्दगंधातील स्वरचित कवितां पैकी एक निवडक कविता सादर करायची आहे. याने पाहुण्यांना विविध विषयांवर आपल्या कविता ऐकायला मिळतील. यानंतर आपण मंच पाहुणे मंडळींना सोपवणार आहोत.
(शब्दगंधींनी आपापली जी कविता निवडली आहे, तिचे नांव व विषय हे ९ ऑक्टोबर पर्यंत कळवावे म्हणजे एकूण कविता वाचनाच्या वेळेचा व विषयांचा अंदाज घेता येईल.)
७.०० ते ७.४५ : कथाकथन - सुखाचा शोध : ज्येष्ठ कवयित्री लेखिका व मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड
७.४५ ते ८.१० : कवितेतील निसर्ग - सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका व मुलाखतकार गौरी कुलकर्णी
८.१० ते ८.३० : ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य - लेखिका कवयित्री रेखा नार्वेकर
८.३० ते ८.४५ : कविता वाचन - लेखिका कवयित्री प्रकाशिका लता गुठे
८.४५ ते ९.०० : कथा अभिवाचन - लेखक , अभियंता प्रकाश कुलकर्णी
९.०० : आभार प्रदर्शन
९.१५ : सहभोजन (म म सिं सह-प्रायोजित)
कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करावी किंवा आपली उपस्थिती shabdagandha@mmsingapore.org वर कळवावी.
कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी shabdagandha@mmsingapore.org ला संदेश पाठवा.
आपली नम्र, कार्यकारिणी महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699