महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) तर्फे सादर होत असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांची मालिका दिवाळीनंतरसुद्धा अशीच चालू राहणार आहे. आता आम्ही खास आपल्या बालचमूसाठी एक कार्यक्रम आखला आहे.
६ नोव्हेंबरला आपण सर्वच लहान मुलांसाठी एक आनंद-मेळावा आयोजित केला आहे. ज्यात सुरुवातीला एक चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. मग १२ धिटुकली मुलं 'सळो की पळो' हे सई परांजपे यांनी लिहिलेलं धमाल नाटक सादर करतील आणि त्यानंतर 'फन-फेअर' ची मजा सर्वांना लुटता येईल. अर्थात मोठ्यांनासुद्धा भरपूर धमाल येईल याची आम्ही खात्री देतो !
'फन-फेअर' मध्ये लहान मुलांनी वेगवेगळ्या खेळांचे स्टॉल लावावेत यासाठी विशेष प्रोत्साहन देत आहोत. या उपक्रमामुळे त्यांना नियोजन, विक्री, प्रसिद्धी, फायदा - तोटा यासारख्या गोष्टी स्वतः अनुभवायला मिळतील.
कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे दिनांक - रविवार ६ नोव्हेंबर २०१६ वेळ
दु ३:१५ ते ३:३० : चित्रकला स्पर्धा नोंदणी दु ३:३० ते ४:१५ : चित्रकला स्पर्धा (वय वर्षे ४ ते १४) विषय : दिवाळी दु ४.३० ते ५.३० : बालनाट्य : "सळो की पळो" दु ५:३० : चित्रकला स्पर्धा निकाल जाहीर संध्या ५:३५ ते ६ : दिवाळी फराळ वितरण व फन फेअर स्टॉल सेटप संध्या ६ ते ७:३० : फन फेअर स्थळ - GIIS क्वीन्सटाऊन, १ मे चिन रोड तिकीट दर (दिवाळीचा फराळ समाविष्ट) १२ वर्षाखालील मुले : १०$ ममसिं सद्स्य (१२ वर्षावरील मुले व मोठे) : १५$ सदस्येतर (१२ वर्षावरील मुले व मोठे) : २०$
तेंव्हा मंडळी या आनंद मेळाव्याला जरूर भेट द्या. मोठ्यांच्या नाटकानंतर आपले लहान सवंगडीही आता 'हम भी कुछ कम नही' म्हणत आपल्यासमोर धमाल बालनाट्य सादर करण्यासाठी खूप मेहनत घेऊन सज्ज झाले आहेत; त्यांचं कौतुक करायला तुम्ही सगळे नक्की याल अशी खात्री आहे.
तेंव्हा भेटूया लवकरच.
सस्नेह, कार्यकारिणी २०१६
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699