नमस्कार पालक हो, सिंगापूरमधे आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक जुने स्वप्न आणि पालकांची मागणी होती. ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. दशकाहूनही अधिक काळ नियमित सुरु असलेल्या मंडळाच्या चार उपक्रमात 'मराठी शाळा' ह्या नवीन उपक्रमाची भर करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात आम्हाला पालकांचा आणि शाळेसाठी शिक्षक म्हणून काम करु इच्छिणार्या सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मराठी शाळा सुरु करण्याची योजना सुरु झाली. शाळा समिती स्थापन करून झाली. विचारविनिमय करून अभ्यासक्रम ठरवून झाला. शाळेचं पालक माहिती सत्र झालं. शिक्षकांची निवडही झाली. आता वेळ आहे शाळेमध्ये मुलांना दाखल करण्याची. तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो आहे की शनिवार, ६ मे २०१७ पासून मराठी शाळा सुरु होत आहे.
'हसत खेळत मराठी' चे धोरण असे आहे:
नावनोंदणीसाठी माहिती खालील प्रमाणे:
शाळेची वेळ: दर शनिवारी दुपारी १:४५ ते ४ (६ मे २०१७ पासून) वयोगट: ५ पूर्ण ते १३ पूर्ण स्थळ: ग्लोबल इंडियन ईंटरनॅशनल स्कूल, मराठी ग्रंथालयाचा वर्ग, क्वीन्सटाऊन, १ मे-चिन रोड, सिंगापूर - १४९२५३
प्रवेश शुल्क: १०$ वार्षिक (१ मे २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७) साधने: वही, पुस्तक, पेन्सिल अशा कोणत्याही साधनांची गरज नाही.
टीप: ११ वर्षापर्यंतच्या मुलांच्या कमीतकमी एका पालकाची व १२ पूर्ण मुलांचे स्वतःचे ममंसिं सभासदत्व असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा प्राजक्ती मार्कण्डेय यांना +६५-९८२८२३४५ वर किंवा marathishala@mmsingapore.org वर.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699