नमस्कार,
आपणा सर्वांना आगामी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
ह्या चिमुकल्या बेटावर भारताच्या कानाकोपर्यातून अनेक मराठी भाषिक येतात, स्थिरावतात आणि मराठी भाषा-संस्कृती इथल्या मातीत रुजवायला सर्वतोपरी मदत करतात. पण, तरीही आपला राकट आणि कणखर महाराष्ट्र देश आपल्याला नेहमीच आठवत आणि साद घालीत असतो.येत्या १ मे रोजी ५८ वा महाराष्ट्र दिन आहे. तो एकत्र साजरा करण्यासाठी आम्ही 'आनंद मेळावा' आयोजित केला आहे. तरी त्यास जरुर यावे ही विनंती.
आनंद मेळाव्याची संकल्पना आहे - खाद्योत्सव व खेळोत्सव (Food Festival & Family Fun Fair)
कार्यक्रमाचा तपशील व नियम असे आहेत : दिनांकः सोमवार, १ मे २०१७ स्थळः ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाऊन, मे-चिन रोड, सिंगापूर. वेळ: सकाळी ११ ते दुपारी २
आनंद मेळावा व नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा प्रवेश: विनाशुल्क खेळाच्या स्टॉलचे दर - S$१०; तात्पुरती ठेव रक्कम S$२० खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे दर - S$२०; तात्पुरती ठेव रक्कम S$२०
* तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमाच्या शेवटी परत केली जाईल. जर नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावला अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम स्थळी अस्वच्छता व नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत मिळणार नाही.
स्टॉल नावनोंदणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना:
१) आनंद मेळाव्यात स्टॉल लावण्यासाठी वा खाद्यपदार्थ स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची मर्यादा नाही. मात्र नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
२) स्टॉल खेळांचा,खाद्यपदार्थांचा अथवा टॅटू, मेंदी, नेल-आर्ट, बलून-स्कल्प्टिंग अशा सेवांचाही असू शकतो.
३) एका स्टॉल वर जास्तीत जास्त २ खाद्य पदार्थ अथवा १ खेळ अथवा एक सेवा ठेवावी. त्यापेक्षा जास्त काही ठेवू नये. तसेच नावनोंदणी करताना जो पदार्थ, खेळ वा सेवा तुम्ही ठरवली असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली ठेव रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या कुठल्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. तुम्ही नोंदवलेला पदार्थ, सेवा किंवा खेळ दुसऱ्या कोणी तुमच्या आधी नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू.
४) स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे. स्टॉल लावणारे मूल जर वय वर्षे १२ च्या खालील असेल तर पालकांपैकी कुणा एकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.
५) काही प्रश्न असतील तर नलिनी थिटे यांना दूरभाष क्रमांक ९२९५-७००० ह्यावर संपर्क करा किंवा vicepresident@mmsingapore.org ह्यावर इ-मेल पाठवा.
६) स्टॉलवर खेळ खेळण्यासाठी आपण जास्तीत जास्त १ डॉलर पर्यंत तिकीट आकारु शकता. खाद्यपदार्थ, टॅटू, मेंदी, नेल-आर्ट, बलून-स्कल्प्टिंग अशा सेवांसाठी ३ डॉलरपेक्षा जास्त तिकीट आकारु नये अशी विनंती. जर तशी गरज भासत असेल तर किमान ३ दिवस आधी आम्हाला संपर्क करुन कार्यक्रमापूर्वीच परवानगी घ्यावी.
७) स्टॉल ३ फुट बाय २ फूट टेबलावर मावेल असा असावा.
८) खेळ सुरक्षितता व स्वच्छता ह्यांचा विचार करुन ठरवलेले असावेत. तसेच, स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस हानी वा खेळणार्या व्यक्तीस इजा पोहोचणार नाही ह्याची कृपया दक्षता बाळगावी. शाळेच्या भिंतीवर काहीही चिकटवण्यास अनुमती नाही. तसेच वीजेचा पुरवठा वा विस्तव लागणारे खेळ सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता स्वीकारले जाणार नाहीत.
९) स्टॉलसाठी नावनोंदणी २९ एप्रिलपर्यंत ONLINE करणे आवश्यक आहे. आयत्या वेळी किंवा आदल्या दिवशी स्टॉल साठी विनंती स्वीकारणे अवघड जाईल. आनंद मेळाव्यासाठी स्टॉल मर्यादित आहेत. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपले स्टॉल आरक्षित करा.
१०) स्टाॅलवर विकल्या जाणा-या खाद्यपदार्थांच्या दर्जाची, अधिकृततेची व त्यातून खाणा-यांवर होणा-या परिणामांची जबाबदारी स्टाॅल लावणा-यांची राहील. मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
तर मंडळी, या आनंद मेळाव्याला सहकुटुंब मित्रपरिवारासह नक्की या आणि तुमच्या छोट्या-मोठ्या दोस्तांच्या स्टॉलचा भरपूर आनंद लुटा.
सस्नेह, आपली कार्यकारिणी, महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) F.A.Q.s :
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699