नमस्कार मंडळी,
दर वर्षी आपण ज्याची आतुरतेने वाट पाहता त्या ममंसिं सहलीचा एक मस्त बेत आम्ही आखला आहे. तो तुम्हाला सांगताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. इंडोनेशियातल्या बिनतान ह्या बेटाला बोटीने जाऊन तेथील शांत निवांत अशा 'बिनतान अॅग्रो रिसॉर्ट' मधे दोन दिवस एक रात्र मुक्काम, व ह्याव्यतिरिक्त बर्याच गमतीजमती असा भरगच्च व छान कार्यक्रम आम्ही आखला आहे.
बिंतानच्या ह्या सहलीविषयीची माहिती खालील प्रमाणे आहे:
१) ही सहल शनिवार, १५ जुलै २०१७ आणि रविवार १६ जुलै २०१७ अशा दोन दिवस एक रात्रीसाठी असणार आहे.
२) Tanah Merah फेरी टर्मिनल पासून सकाळी ८:४० वाजता बोट निघेल आणि १६ जुलैला संध्याकाळी ५ वाजता बिंतानवरुन परतीचा प्रवास सुरु होईल.
३) सहलीसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत बुधवार, २८ जून २०१७पर्यंत आहे.
४) सहलीला येणार्या प्रत्येकाकडे वैध पासपोर्ट (Valid Passport) असण्याची गरज आहे. तुमचा पासपोर्ट १५ जुलै २०१७ पासून पुढील सहा महिन्यांपर्यंत वैध असावा. नावनोंदणी करताना तुमच्या पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांची स्कॅन केलेली प्रत treasurer@mmsingpore.org वर इमेल करुन पाठवावी.
५) भारतीय आणि सिंगापूर नागरिकत्व असलेल्या प्रवाशांना बिंतानमधे प्रवेश मिळायला व्हिसा लागत नाही.
६) सहलीचे शुल्क (सिंगापूर डॉलरमधे) खालीलप्रमाणे आहे.
७) वरील शुल्कामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी -
८) वरील शुल्कामध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी -
९)बिनतान फेरी टर्मिनलवर ५५,००० इंडोनेशिया रूपिया भरावयाचा कर हा सिंगापूर डॉलरमधे स्विकारल्या जाणार नाही. तेंव्हा, पर्यटकांनी इंडोनेशिया रूपिया हेच चलन सोबत आणावे. ही रक्कम प्रत्येक पर्यटकांनी स्वतःहून भरायला हवी असा नियम आहे.
१०) शाकाहारी आणि मासांहारी दोन्ही पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नावनोंदणी करताना उपलब्ध असलेल्या आहारापैकी तुम्हाला हवा असलेल्या आहाराची निवड करा. ऐनवेळी ह्यात कुठलाही बदल करणे शक्य होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.
११) ३० जून २०१७ नंतर ह्या प्रवासाची रुपरेषा सांगणारे अजून एक पत्रक आम्ही आपल्याला पाठवू.
१२) जर तुम्हाला तुमच्या नावनोंदणीमधे काही बदल करावयाचा असेल वा नाव रद्द करायचे असेल तर ते २८ जून पर्यंत करु शकता. त्यानंतर कुठल्याची बदलांची दखल घेतली जाणार नाही ह्याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी.
१३) ह्या सहलीविषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कार्यालयीन वेळेनंतर समीर कोझरेकर ह्यांना ९७२९६१६५ किंवा सदानंद राजवाडे ह्यांना ९०८८६०८४ ह्या त्यांच्या दूरभाष क्रमांकावर संपर्क करु शकता.
१४) तुम्हाला प्रवासाची रक्कम कशी भरायची ह्यासंबंधी जर माहिती हवी असेल तर तुम्ही मंडळाच्या खजिनदार स्मिता अंबिके ह्यांना ८१४३७७९० त्यांच्या ह्या दूरभाष क्रमांकावर फोन करु शकता.
विशेष टीप : जर ऐनवेळी हवामानात प्रतिकूल बदल झाला तर मंडळाला ह्या सहलीमधे परिस्थितीनुसार बदल करण्याची गरज भासू शकते ह्याची कृपया सर्व पर्यटकांनी नोंद घ्यावी. तसेच रजिस्टर करताना TERMS & INDEMNITY नीट वाचून मान्य कराव्यात ही विनंती.
आपली कार्यकारिणी, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699