• Home
  • Brain Workout - A Fun Holiday Workshop by MMS - Session 2

Brain Workout - A Fun Holiday Workshop by MMS - Session 2

  • Sun, June 10, 2018
  • 3:00 PM - 5:00 PM
  • Global Indian International School, Queenstown
  • 0

Registration


Registration is closed

आपल्या छोट्या मंडळींच्या सुट्ट्या लवकरच सुरु होत आहेत. अशा वेळी सुट्टीत काहीतरी उपयोगी पण धमाल करता येईल का? हा प्रश्न सर्व पालकांना पडलेला असतो, नाही का? फिकर नॉट। महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे एक असे वर्कशॉप ज्यात मजा पण आहे आणि शिकायला पण। म्हणजे बच्चे कंपनी पण खुष आणि पालक ही खुष.

'Mensa' संस्थे बद्दल आपण बहुतेकांनी ऐकलं असेलच. अतीशय हुशार लोकांची म्हणजे जगातील Top २% IQ मध्ये गणले जाणाऱ्या लोकांची ही संस्था आहे.

आनंदाची गोष्ट अशी आहे की, अशा या संस्थेची एक कार्यशाळा - Brain Workout - आपल्या MMS च्या मुलांसाठी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेचा विषय असेल 'Utilizing Our 5 Senses'.

आपल्या मुलांना एक निराळा अनुभव द्यायची व त्यांची बुद्धिमत्ता विकसित करायची ही उत्तम संधी सोडू नका.

तारीख : १० जून २०१८, रविवार
वेळ: दुपारी ३ ते ५
वयोगट: ८ ते १४ वर्ष
ठिकाण: ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, Queenstown
शुल्क: ममंसिं सदस्यांची मुले - ५$, असदस्य - १०$

तर वाट कसली बघताय? आजच आपल्या मुलांना व त्यांच्या मित्रमंडळींना कार्यशाळेसाठी नोंदवा. नोंदवण्यासाठी www.mmsingapore.org ला भेट द्या. जागा मर्यादित असल्यामुळे फक्त थोडी मुले भाग घेऊ शकतील.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा - कल्याणी : ९४४६२७५१.

More about Tribal MENSA:

सन २००२ मध्ये पुण्यातील डॉ. नारायण देसाई यांनी पुण्याजवळील आदिवासी शाळेत Mensa ची निवड चाचणी घेतली व त्यात ४ आदिवासी मुली उत्तीर्ण झाल्या. आता या मुलींना घडवण्याची जबाबदारी आली व त्यातूनच Tribal Mensa Nurturing Program (TMNP) चा जन्म झाला. गेल्या १५ वर्षात TMNP ने ५०+ आदिवासी व ग्रामीण शाळांमधील २५००+ Mensan शोधले व या मुलांसाठी त्यांनी संवर्धन प्रकल्प राबवला. त्यांचे सर्व प्रकल्प हे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात व non academic असतात. मुलांमधील कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, निरीक्षण, नेतृत्व अशा अनेक गुणांना विकसित करतात. या सर्व उपक्रमातून आदिवासी व ग्रामीण भागातून विद्यार्थी पुढे येऊन उद्या भारताचे नेतृत्व करावे असा प्रयत्न आहे. जागतिक पातळीवर TMNP च्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. New York Times मध्ये देखील त्यांच्या कार्यावर लेख छापून आला होता. सॅन २०१६ मध्ये European Council for High Ability ने TMNP ला आपले यूरोपबाहेरील पहिले Talent Center घोषित केले.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software