प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान ! ते नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व फर्डे वक्ते तर होतेच पण ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते ही होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते.
अत्रे आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकण्यासाठी प्रसिद्ध ! जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी पत्रकारीता केली, मासिके काढली, चित्रपट कथा लिहिल्या, २५ एक गाजलेली नाटकं लिहिली, कथासंग्रह लिहिले, कादंब-या लिहिल्या, काव्यसंग्रह लिहिले, आत्मचरित्र लिहिले. एवढंच काय, शाळांसाठी क्रमिक पुस्तके ही लिहिली.
येत्या गणेशोत्सवात त्यांच्या १२० व्या जन्मशताब्दीनिमित्त 'जे जे उत्तम' ह्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील या झंझावाती व्यक्तिमत्वाच्या निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहोत.
'जे जे उत्तम' ह्या कार्यक्रमाबद्दल माहिती : १) हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी ग्लोबल इंडियन स्कूल, पुंगोल ह्या शाळेच्या आवारामधे होणार आहे. २) कार्यक्रम श्री गणरायाची आरती आणि प्रसादग्रहणानंतर रात्री ७:३० वाजता सुरु होईल. ३) कार्यक्रमाचा विषय आहे - प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे ह्यांच्या साहित्याचे वाचन. ४) वाचनाची कालमर्यादा प्रत्येकी ३ ते ५ मिनिटे. (लहान मुलांना ३ मिनिटे, मोठ्यांना ५ मिनिटे) ५) सहभागासाठी ममसिं सभासदत्व असणे गरजेचे. ६) 'जे जे उत्तम'ची निवडचाचणी शनिवार दिनांक 25 ऑगस्ट २०१८ रोजी असणार आहे.
सस्नेह, आपली कार्यकारिणी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699