महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या सर्व सभासदांना आणि सिंगापूरवासी मराठी जनतेला सप्रेम नमस्कार!
शालिवाहन शके १९४१, चैत्र शुध्द प्रतिपदा, ६ एप्रिल इ.स.२०१९, म्हणजे आपला गुढी पाडवा, आपले “Hindu Happy New Year”..!! सिंगापूर मधे गेली कित्येक वर्षे पाडव्याचा पवित्र मुहुर्त साधून, महाराष्ट्र मंडळात आपण सर्व एकत्र येऊन हा आनंद-सोहळा द्विगुणित करतो!
या वर्षी आणखी दोन मंगल योगायोग आहेत – वर्षप्रतिपदा तर आहेच, महाराष्ट्र मंडळ आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे आणि शिवाय, हे वर्ष महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि कला-दैवत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजेच आपले पु.ल. यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने जगभर “पुलोत्सव” साजरा होत आहे आणि आपणही त्यात आपला सहभाग देऊन आपले पु.ल. व त्यांच्या निर्मितींवरचे प्रेम,आणखी वर्धिष्णू करणार आहोत!!
पाडव्याच्या दिवशी सकाळी, महाराष्ट्र मंडळाचा गुढी उभारण्याचा व गुढी-पूजनाचा कार्यक्रम ठरला आहे. वर्ष-प्रतिपदेची गुढी ही शौर्य, मांगल्य, पराक्रम, पावित्र्य, ’रामराज्य’ अशा अनेक गुणांचे प्रतिक आहे. मंडळाच्या नविन कार्यकारिणीची ओळख, काही स्मृती-चित्रे याबरोबरच दोन मस्त कार्यक्रम, मंडळ व पुलोत्सव समिती आपल्यासाठी घेऊन येत आहे.
१. पुलं वरील अनेक व्यंगचित्रांचे प्रदर्शन – खास पुलंच्या अनेक स्नेह्यांनी उपलब्ध करून दिलेली जवळ जवळ १०० चित्रे आहेत, त्यातील निवडक २५-३० चित्रांचे प्रदर्शन
२. “गुण गाईन आवडी” – पु.लं.नी अनेक व्यक्तिचित्रे लिहिली. ह्यात संगीत कला-क्षेत्रातील दिग्गज्जांची गुणसंपन्नता त्यांनी आपल्या अत्यंत रंजक, मोहक व चित्त वेधून ठेवणाऱ्या शब्दांच्या महिरपींतून आपल्या वाचकांच्या समोर आणली. ज्योत्स्ना भोळे, लता मंगेशकर, माणिक वर्मा, बेगम अख्तर, पं.वसंतराव देशपांडे, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.कुमार गंधर्व अशा काही मोजक्या कलाकारांवरील लिखाणाचे अभिवाचन व त्यांच्या संगीताचे-गाण्यांचे सादरीकरण, संगीत क्षेत्रातील अतिशय ताकदीचे नामवंत कलाकार करणार आहेत. पं.विजय कोपरकर, डॉ.रेवा नातू, संवादिनी वादक लिलाधर चक्रदेव आणि आपल्याच सिंगापूरचे तबला-नवाज गुरू श्री.नवाज़ मिरजकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. साथीला मंडळाचेच काही अरूण-तरूण वादक कलाकार देखिल असतील. कार्यक्रमात नाट्यगीते, ठुमरी, गझल, भावगीते, भजन अशा विविध गायन-प्रकारांची एक मेजवानीच आपल्यासमोर सादर होईल.
३. नव-विवाहित दांपत्यांना “यजमानपदी” गुढी-पुजनास खास आमंत्रण – आपला विवाह जर मागच्या वर्षप्रतिपदेनंतर झाला असेल, तर आपण गुढी-पुजनास सह-यजमान म्हणून या व गुढीपुजन करून आशिर्वादाचा लाभ घ्या !
तेव्हां मंडळी, त्वरा करा आणि कार्यक्रमातील आपली उपस्थिती नक्की करा:-
दिवस, वेळ व साधारण रूपरेषा
शनिवार ६ एप्रिल २०१९:
९:०० ते ९:३० गुढी-पूजन व गुढी-रोहण ९:३० ते १०:३० २०१९ कार्यकारिणीची ओळख, उपक्रमांची माहिती, गुण-विशेष कौतुके १०:३० ते १०:४५ !! अल्प-स्वल्प-विराम !! १०:४५ ते १:१५ “गुण गाईन आवडी” १:१५ ते २:०० स्नेह-भोजन
नकाशा, बस-सेवे बद्द्ल माहिती
https://www.google.com.sg/maps/place/Shaw+Foundation+Alumni+House/@1.2931858,103.7730656,18.68z/data=!4m5!3m4!1s0x0:0x7ae21f4141402cfd!8m2!3d1.2931357!4d103.7736711
https://uci.nus.edu.sg/oca/transport-logistics-carpark/getting-around-nus/#1525082102764-4da914d3-5531
प्रवेश-शुल्क (भोजनासहित )/Entrance fees (including lunch)
सभासद (members): S$२५/- ; (S$25/-) सभासद नसलेले (non-members): S$३५/- ; (S$35/-) १२ वर्षांखालील मुले (children below 12yrs): S$१५/- ; (S$15)
अधिभार (late fee): तिकिटे २ एप्रिलच्या नंतर आरक्षित केल्यास वरील प्रवेश-शुल्काच्या अतिरिक्त, $10/- अधिभार लागेल. A $10/- surcharge/late fee will be added to above Entrance fees if booking is made after 2nd April
अधिक माहिती
१.जनसंपर्क अधिकारी – माधवी किंजवडेकर - 92370128 २.उपाध्यक्ष – आशिष पुजारी - 92706100 ३.कोषाध्यक्ष – मृणाल मोडक - 97101739
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699