• Home
  • MMS Ganeshotsav 2019 - VividhaGunadarshan : Inviting Entries

MMS Ganeshotsav 2019 - VividhaGunadarshan : Inviting Entries

  • Sat, September 07, 2019
  • 3:00 PM - 7:30 PM
  • Global Indian International School, 27 Punggol Field Walk, Singapore 828649

Registration

  • Please register the team leader first - a performing member or non-performing lead. Team leader will be the point of contact for your group.

    Then click "ADD GUEST" and add each performing member one by one. The guest details have to be the performing person's details. If it is a child below 12, please mention the child's name but email address and phone number should be that of the Member Parent. The email address will be used to verify the membership of the performing child/parent.

Registration is closed
नमस्कार मंडळी,

आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन आता काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. ५ दिवस चालणाऱ्या या आनंदोत्सवाची आपण नेहमीच वाट बघत असतो. या आनंदोत्सवाला जोड लाभली आहे ती आपल्या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर आपण आनंदोत्सव साजरा करतोच आहोत मग हाच उत्सव आपण यावर्षी आपल्या लाडक्या विविध गुण दर्शन या कार्यक्रमातून साजरा केला तर? छान कल्पना आहे नाही का? आनंदोत्सव हीच संकल्पना घेऊन यावर्षीचा विविध गुण दर्शन हा कार्यकम आपण करणार आहोत.

मंडळी, नृत्य म्हणजे काय तर मानवी भाव-भावनांचा अविष्कार. कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी सहज स्फुरते ते नृत्य.. मग ते शास्त्रीय असो की फिल्मी आणि शिकून व्यवस्थित बसवलेले असो वा संगीताच्या तालावर आतून स्फुरलेले, त्यातून आनंद साजरा केला जातो. वर्षा ऋतूच्या आगमनाने हर्षोल्हासित होऊन मोर सुद्धा पिसारा फुलवून नृत्य करायला लागतोच. सण- समारंभ, यानिमित्ताने सगळ्यांचीच पावलं थिरकतात. सणासुदीला केली जाणारी पारंपारिक नृत्ये, शास्त्रीय नृत्ये किंवा नव्या पिढीची आधुनिक नृत्यशैली यातून होणारा आनंदोत्सवाचा अविष्कार आपल्याला नृत्यातून सादर करायचा आहे.

विविध गुणदर्शन मध्ये नृत्याव्यतिरिक्त इतर कलागुण सादर करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्की स्वागत आहे. एखादे समूहगान ( group song ), प्रहसन ( skit ), किंवा नाट्य प्रवेश आपण सादर करू शकता.

मग मंडळी लागा तयारीला आणि तुमच्या प्रवेशिका लवकरात लवकर आमच्याकडे पाठवा.


कार्यक्रमाचे नियम व अटी खालीलप्रमाणे.

  •  प्रत्येक सादरीकरणाचा अवधी ४ मिनिटे असेल.
  • सादरीकरण सामूहिक असावे.
  • नाव नोंदणी करताना २ गाण्यांची नावे देणे आवश्यक. तुमचे पहिले गाणे दुस-या कोणी तुमच्या आधी निवडले असल्यास तुम्हाला दुस-या गाण्यावर कार्यक्रम बसवण्यास सांगण्यात येईल.
  • कृपया अश्लील, उत्तान वा भडक शब्द वा नाचाची गाणी न निवडता, मराठी सुसंस्कृतीला साजेशी निवडावित
  • तुमच्या निवडलेल्या गाण्याला परवानगी नाकारण्याचा हक्क मंडळाकडे राहील.
  • महाराष्ट्र मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे.
  • १२ वर्षांखालील मुलांच्या सहभागासाठी किमान एका पालकाने सभासद असणे आवश्यक आहे.
  • एका व्यक्तीने एकाच कार्यक्रमात भाग घ्यावा
  • निवडचाचणी व्हिडिओ द्वारा घेतली जाईल. त्यासाठी तुमच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आम्हाला २० जुलै २०१९ पर्यंत पाठवणे अपेक्षित आहे. त्याबद्दल अधिक माहिती नावनोंदणी केलेल्या गटांच्या प्रमुखास २५ जुलै  नंतर कळवण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी माधवी किंजवडेकर (९२३७०१२८),  श्यामल भाटे  (९१४५३५५१) यांना संपर्क करा. 

आपली कार्यकारिणी,

महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software