सर्वांना सप्रेम नमस्कार! आपल्या रौप्यमहोत्सव सांगतां सोहळ्यातील खाद्यमेळाव्यासाठी उत्स्फूर्ततेने स्टाॅल नोंदणी साठी लवकरात लवकर नावे नोंदवा . स्टाॅल नोंदणी साठी संम्पूर्ण कार्यक्रमाचे मोठ्यांचे (Adult) तिकीट घेणे आवश्यक आहे. खाद्यमेळावा कार्यक्रम व शुल्काची माहिती :
दिनांकः रविवार ४ ऑगस्ट २०१९ स्थळः ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, २७ पुंगोल फिल्ड वाॅक, सिंगापूर - ८२८६४९ वेळ: सकाळी ११ ते दुपारी १.३० खाद्यपदार्थांचे स्टॉल :$ २५/- तात्पुरती ठेव रक्कम (deposit) S$५०
थोडे अधिक नियम व काही अटी तर पाळाव्या लागतील त्या खालील प्रमाणे असतील: १. खाद्य पदार्थ घरून करून आणावा व शाकाहारीच असावा. २. पदार्थाची किंमत $५/- जास्त नसावी . ३. निरनिराळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नांव-नोंदणी आवश्यक आहे . ४. नांव-नोंदणी करताना जो पदार्थ ठरवला असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम- स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली ठेव रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. तुम्ही नोंदवलेला पदार्थ तुमच्या आधी नोंदवला असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू. ५. स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे विद्यमान सभासदत्व असणे आवश्यक आहे. स्टॉल जर लहान मुले लावणार असतील (वय वर्षे १२ च्या खालील) तर पालकांपैकी किमान एकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे सभासदत्व घेणे शक्य आहे. ६.काही शंका असतील तर भूषण गोरे यांना 97102845 ह्या नंबरवर मेसेज करा किंवा feedback@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवा महत्वाची सूचना - * तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमाच्या शेवटी परत केली जाईल. जर नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावला अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत मिळणार नाही. काही महत्वाचे नियम: 1. स्टॉल ३ फूट बाय २ फूट टेबलावर मावेल असा असावा. 2. स्टाॅल सुरक्षतता व स्वच्छता ह्यांचा विचार करुन ठरवलेले असावेत. तसेच, स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस हानी वा खेळणार्या व्यक्तीस इजा पोहोचणार नाही याची कृपया दक्षता. बाळगावी. शाळेच्या भिंतींवर काहीही चिकटवण्यास अनुमती नाही. 3. स्टॉलसाठी नावनोंदणी २५ जुलै पर्यंत ONLINE करणे आवश्यक आहे. आयत्या वेळी किंवा आदल्या दिवशी स्टॉल साठी विनंती स्विकारणे अवघड जाईल. स्टाॅल मर्यादित आहेत. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपले स्टॉल आरक्षित करा. 4. स्टॉलवर विकल्या जाणा-या खाद्यपदार्थांच्या दर्जाची, अधिकृततेची व त्यातून खाणा-यांवर होणा-या परिणामांची जबाबदारी संपुर्णपणे स्टॉल लावणा-या व्यक्ती किंवा (मुले असल्यास) त्यांच्या पालकांची राहील. मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. यासाठी मुख्य म्हणजे स्टॉल लावणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची अतिशय दक्षता घेंणे अत्यावश्यक आहे. 5. व्यापारी-स्तरावर विक्रीस सक्त मनाई . 6. आपल्या लागणारी साधने – टेबल-क्लॉथ, disposable items, सुट्टे पैसे ईत्यादींची व्यवस्था आपण स्वत:च करायची आहे. Electrical points, outlets strictly cannot be used. E.g. please bring your own hot-cases, ice packs etc. तेव्हां मंडळी, वरील सर्व मजकूर आणि नियम कृपया नीट समजून घ्या आणि त्वरा करा; आपली नांवे नोंदवा. आपली स्नेहांकित, कार्यकारिणी, महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699