• Home
  • MMS Fitness कट्टा - Yoga 02

MMS Fitness कट्टा - Yoga 02

  • Sat, May 30, 2020
  • 5:30 PM - 6:30 PM
  • Online - Video Call

Registration


Registration is closed


नमस्कार

मागच्या एका आठवड्याच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपण Yoga Session साठी तयार व्हा.

हे सत्र आपल्यासाठी घेऊन येत आहेत अर्चना अमलापुरे

अर्चना अमलापुरे  हे नाव सिंगापूर मधील  हेल्थ आणि फिटनेस  विश्वातील एक नावाजलेलं नाव आहे. “ओजस योगा “ ही सिंगापूर मधील  शास्त्रीय पद्धतीने योगासन किंवा तत्सम पद्धतीचा अभ्यास करून त्याचा उपयोग “आरोग्यम धनसंपदा" हे सूत्र लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणारी एक अग्रगण्य संस्था आणि आपली मराठमोळी अर्चना त्याची संस्थापक आहे ही बाब अभिमानस्पद आहे. SAP सारख्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनी मध्ये साधारण १२ वर्षे काम केल्यावर, कंपनीतील ताणतणाव लोकांच्या आयुष्यावर किती परिणाम करू शकतो याची जाणीव झाल्यामुळे योगासनाकडे वळणारी अर्चना आज तिला झालेला फायदा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत आहे. धकाधकीच्या आजच्या आयुष्यात रोजच्या आयुष्यातले असो कि करोना सारखे असोत, ताण हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा परिणाम आपल्या शारीरिक मानसिक आयुष्यावर खूप सखोलपणे होत असतो आणि त्याला व्यवस्थिपणे हाताळण्यासाठी योगासनाशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही असं अर्चनाच मत आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्यापरीने वेगळी असते आणि तिचं शरीर / मन  ताण तणावाला वेगळ्या पद्धतीने हाताळत असतं. त्यामुळे योगासनं असोत की अजून दुसरं काही, प्रत्येकाचा आरोग्य चा समतोल साधायचा प्रवास हा वेगळा असतो. आयुष्यात एकंदरीत सकारात्मकता आणण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी त्या व्यक्तीचं  वेगळेपण जपणारा,  एक संपूर्ण प्लॅन अर्चना तिच्या ऑनलाइन किंवा ऑफलाईन वर्गांमधून सर्वांपर्यंत घेऊन येते.

अर्चनाचे हे सत्र अनुभवायचा फायदा घ्या. 

नेहमी प्रमाणे व्यायामास उपयुक्त कपडे, जवळ एक छोटा towel आणि आपली पाण्याची बाटली जरूर ठेवा.
 
भेटूया तर मग ह्या शनिवारी ३० मे ला संध्याकाळी ५:३० वाजता


आपली कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software