सर्व म.मं.सिं. सभासद व मित्र मंडळींना नमस्कार! कोविड-१९ च्या साथीत तुम्ही सर्वजण आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित असाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि सदिच्छा व्यक्त करतो.
सद्यपरिस्थितीत आपल्याला एकत्र भेटून कार्यक्रम करता येणे अवघड आहे. पण त्याने डगमगून ना जाता आपण उत्साहाने अनेक उपक्रम online राबवले आहेत. त्यांना छान प्रतिसाद आहे. नाट्यरंग, नृत्यरंग, स्वरगंध, Fitness कट्टा, पाककला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कला शिबीर याबद्दल तुम्ही ऐकले असेल, त्यात भागही घेतला असेल. आणि अर्थात,आपले नुकतेच झालेले बालनाट्य “चांभार चौकशीचे नाटक” याला देशाविदेशातून जोरदार प्रतिसाद मिळाला ते ही तुम्ही पाहिले असेल. आम्ही ११ एप्रिल २०२० रोजी म.मं.सिं. संवादतर्फे तुमच्याशी संपर्क साधला होता. यातील काही उपक्रम हे त्यातून आलेले आहेत. तुम्हा सर्वांचे त्याबद्दल खूप आभार.
म.मं.सिं.ने एखाद्या सत्राखाली वैचारिक विषयांवर चर्चा करावी अशी मागणी तुम्हा सर्वांतर्फे होत आहे. त्याला मान देऊन “म.मं.सिं. संवाद” हा नवीन चर्चासत्र उपक्रम आम्ही सुरु करत आहोत. बाकी ऑनलाईन उपक्रमांप्रमाणेच या उपक्रमाला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या अशी विनंती.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती अथवा काही सूचना असल्यास आम्हाला feedback@mmsingapore.org ह्या ई-मेल वर कळवाव्या.
आपली म.मं.सिं. कार्यकारिणी
म मं सिं संवाद - भाग १ : ऋणानुबंध - डॉ बाळ फोंडके
ऋणानुबंध म्हणजे काय? नातीगोती?... ती तर आहेतच. पण ऋणानुबंध त्याही पलीकडे जातात. धर्म, प्रांत, भाषा, राष्ट्र असा कोणताही समान धागा नसताना प्रस्थापित होणारे मजबूत भावबंध असं त्यांना म्हणता येईल. ऋणानुबंध अणूसारखे असतात.
मध्यवर्ती केंद्रकात आपण आणि त्याच्या भवती निरनिराळ्या कक्षांमधून फिरणारे इलेक्ट्रॉन म्हणजे आपले नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी.
गुंतागुंतीची नाती हे तर मानवजातीचे खास वैशिष्ट्य. त्यात आपल्या सांस्कृतिक पर्यावरणातही सतत बदल होत असतात. त्यांच्याशी जुळवून घेत आपली सांस्कृतिक उत्क्रांती होत असते. एकविसाव्या शतकात सुनामी आल्यासारखे पाच जबरदस्त प्रवाह आपल्यावर प्रभाव पाडत आहेत. जागतीकीकरण, आर्थिक उदारीकरण, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि दहशतवाद. त्यांच्याच साथीला आता करोनाची साथही धावून आली आहे. त्यापायी जी काही प्रचंड घुसळण होत आहे तिच्यामुळे नात्यांच्या स्वरूपात आमूलाग्र फरक होत आहे, होणार आहे. त्यांचा धांडोळा आताच घेतला तर त्यांना सामोरं जाण्याची वाट आपल्याला सापडेल.
ऋणानुबंधांच्या या विज्ञानाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉ. बाळ फोंडके.
बाळ फोंडकेंना कोण ओळखत नाही? ते प्रसिद्ध शास्त्रज्ञ, मराठी विज्ञानकथा लेखक आणि विचारवंत तर आहेतच. त्यांनी nuclear biologist म्हणून भाभा अनुसंधान संस्थेत काम केले आहे. ते टाइम्स ऑफ इंडियाच्या सायन्स टुडे या मॅगझीनचे संपादक होते. तसेच टाइम्स ऑफ इंडियाचे सायन्स एडिटर म्हणून त्यांनी काम पहिले आहे. नंतर ते CSIR (Council of Scientific and Industrial Research) च्या National Institute of Science Communication चे संचालक होते. सध्या ते बऱ्याच विद्यापीठांचे सल्लागार आहेत. त्यांनी विज्ञानावर खूप लेख आणि गणितावर पुस्तके लिहिली आहेत. ते त्यांच्या विज्ञानकथांबद्दल आणि विज्ञान-कथाकथनाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत.
त्यांच्याबरोबर ही चर्चा करूया येत्या रविवारी २१ जून २०२० रोजी दुपारी ३ ते ४ Online.
हे विनामूल्य सत्र खास मंडळाच्या सभासदांसाठी आहे. ह्यासाठी www.mmsingapore.org वर रजिस्टर करा. तुम्ही जितक्या devices वरून बघणार असाल तेवढी रजिस्ट्रेशन करावी ही विनंती. एका घरातून सर्वजण एकाच device वरून बघणार असाल तर एकच नोंदणी पुरेशी आहे. Online link रजिस्टर केलेल्या सभासदांना कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ई-मेल द्वारे पाठवण्यात येईल.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699