• Home
  • नृत्य कार्यशाळा सत्र २ | Dance Workshop Season 2

नृत्य कार्यशाळा सत्र २ | Dance Workshop Season 2

  • Sun, July 05, 2020
  • Sun, July 26, 2020
  • 4 sessions
  • Sun, July 05, 2020, 5:00 PM 6:00 PM (UTC+08:00)
  • Sun, July 12, 2020, 5:00 PM 6:00 PM (UTC+08:00)
  • Sun, July 19, 2020, 5:00 PM 6:00 PM (UTC+08:00)
  • Sun, July 26, 2020, 5:00 PM 6:00 PM (UTC+08:00)
  • Online - Zoom
  • 17

Registration


Registration is closed

<S C R O L L   D O W N   F O R   E N G L I S H >

सर्व सिंगापूरवासी मराठी जनतेला सप्रेम नमस्कार ! 

आपल्या सर्वांना माहीतच आहे कि म.मं.सिं.नृत्यरंग सध्या Zoom द्वारे नृत्यांची कार्यशाळा घेत आहे. ७ जून पासून सुरु झालेल्या पहिल्या नृत्यकार्यशाळेला सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. प्रथम सत्रात भाग घेतलेल्यांना लावणी आणि देवी स्तुती शिकायची संधी मिळाली. आम्ही लवकरच पहिल्या सत्रात शिकवलेल्या नृत्याचा एक विडिओ म.मं.सिं. च्या फेसबुकवर प्रसिद्ध करू.

५ जुलै २०२० पासून सुरु होण्याऱ्या दुसऱ्या सत्रात आपल्याला कथ्थकवर आधारित नृत्य शिकवायला येत आहे स्नेहा टिळक.  

  • हे सत्र ४ आठवडे दर रविवार संध्याकाळी ५ ते ६ ऑनलाईन असणार आहे. 
  • कथ्थकचा पूर्वानुभव असणे आवश्यक नाही.
  • ही कार्यशाळा विनामूल्य आहे
  • ह्यात भाग घेण्यासाठी म मं सिं चे सभासद आणि वय वर्षे १३+ असणे आवश्यक आहे
  • नावनोंदणीची शेवटची तारीख ४ जुलै आहे

  • ५ जुलै रोजी सकाळी सर्व नावनोंदणी केलेल्या सभासदांना झूम ची लिंक ई-मेल द्वारे पाठवण्यात येईल

नृत्य निर्देशिकेची थोडक्यात ओळख  

स्नेहा लहानपणापासूनच म.मं.सिं. शी संलग्न आहे आणि तिने मंडळाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतलेला आहे. 

स्नेहा टिळक हिने आपल्या कथ्थक शिक्षणाची सुरुवात गुरु मुक्ता जोशी, ठाणे, भारत यांच्याकडे केली. सिंगापूरमध्ये ती २०१३ पासून गुरु भूपाली देशपांडे-कुलकर्णी यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेत आहे.  तिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून कथ्थक विशारद पूर्ण ही पदवी संपादन केली आहे.  आतापर्यंत भारत आणि सिंगापूरमधील जवळपास चाळीस कार्यक्रमात तिचा सहभाग राहिला आहे. डान्स रिफ्लेक्षन , कथ्थक की कहानी (नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर), कृष्ण मंजिरी( सिंगापूर) २०१३ आणि २०१९, सिंगापूर इंडियन क्लासिकल म्युझिक अँड डान्स फेस्टिवल २०१४, कथ्थक प्रवाह सिंगापूर (२०१५, २०१७, आणि २०१८) ह्या कार्यक्रमात ती सहभागी होती. तसेच तिने सिंगापूर इंडियन क्लासिकल म्युझिक अँड डान्स फेस्टिवल २०१९ मध्ये एक तासाचा कथ्थक एकल कार्यक्रम  सादर केलेला आहे. कथ्थक नृत्यातील मान्यवर दिग्गज पंडित बिरजू महाराज, श्रीमती मनिषा साठे, श्रीमती शमा भाटे, श्रीमती गौरी दिवाकर आणि श्रीमती पार्वती दत्ता यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी तिला विविध कार्यशाळांमधून प्राप्त झालेली आहे.

आपल्या संयोजकांनी व स्वयंसेवकांनी हा कार्यक्रम उत्साहाने रचला आहे. ह्याला प्रचंड प्रतिसाद द्यायला आपणही उत्सुक असाल ही खात्री आहेच. चला तर, तपशीलाची नोंद घ्या आणि आपले नाव नोंदवा. 

अधिक माहितीसाठी संपर्क करा:- मृणाल मोडक (९७१०१७३९), अनीशा म्हैसाळकर (९११४७२२२) 

ता. क. : कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्राची माहिती लवकरच कळवू.

सस्नेह,

म. मं. सिं. कार्यकारिणी 

-------------------------------------------


-------------------------------------------

Hello to everyone! 

As you would be aware that MMS Nrutyarang is conducting online Dance Workshops via ZOOM for its members. We have received a great response to our 1st workshop (4 sessions) that started from 7 June 2020. Participants got the opportunity to learn Lavani and Devi Stuti in it. We will be sharing a special video compilation of the dances from this workshop on MMS Facebook page. Details of the 3rd session will be also be shared soon.

Our instructor for the 2nd session starting from 5th July is Sneha Tilak who will be teaching us Kathak-based choreography. 

  • This workshop will be held every Sunday from 5 pm to 6 pm and include 4 sessions. 
  • It is not mandatory to have prior Kathak training.
  • This Dance workshop is free. 
  • Participants must be current members of MMS and of age 13 & above.
  • The deadline for registration is 4th July.
  • The zoom link to join this workshop will be sent to all registrants by email on 5th July morning.

About the instructor

Sneha Tilak has been a member of MMS for a long time and has been an active participant in various MMS activities. 

Sneha started training in Kathak at a young age under the able guidance of Mukta Joshi in Thane, India. In Singapore, she has been training under guru Mrs. Bhupali Deshpande-Kulkarni since 2013 and has completed her Visharad Purna (Bachelors) exam of the Akhil Bhartiya Gandharva Mahavidyalaya in Kathak. Sheha has give n close to 40 performances in India and Singapore including DanceReflections, Kathak Ki Kahani (UCC, NUS), Krishna Manjiri 2013 & 2019, SIFAS Indian Classical Music and Dance Festival 2014, and Kathak Pravaha 2015,2017 & 2018. She has also given a 1 hour solo at the SIFAS Indian Classical Music and Dance Festival 2019 . She also had the privilege to attend workshops and learn from Kathak maestros Pt. Birju Maharaj, Smt. Maneesha Sathe, Smt. Shama Bhate, Smt. Gauri Diwakar and Smt. Parwati Dutta.

Please do register to participate in this activity. 

For more information, please feel free to reach Mrunal Modak (97101739) or Aneesha Mhaisalkar (91147222).

Sincerely,

MMS Working Committee 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software