दिवसभर आकाशात सूर्य तळपत असतो, घामाने अंग भिजून निघत असते, जीव थंड हवेसाठी आणि वाऱ्याच्या एका हलक्या झुळुकीसाठी आसुसलेला असतो... इतक्यात किलकिल्या डोळ्यांना झाडांमागून, इमारतींमागून एक करडी चादर आभाळ झाकत येताना दिसते... अचानक विजेचे लोळ चमकतात अन् भवताल गडगडून हसतो ! सिंगापूरकरांना कितीही वेळा अनुभवलं तरी नव्याने भेटणारं हे सुख म्हणजे पावसाचा आनंदोत्सव !
साहित्य सहवासच्या पुढच्या बैठकीचा विषय खास कवीमनाच्या आवडीचा.. पावसाच्या कवितांचा... ही बैठक आपण करत आहोत २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता. तेव्हा तुम्ही लिहिलेल्या पावसाच्या कविता बाहेर काढा. तयार नसतील तर लेखण्या बाहेर काढा आणि एखादी मस्त कविता लिहाच. सध्या वातावरण ही अनुकूल आहे. पावसाची कवीमनाला साथ आहे. ते ही शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही. एखाद्या प्रतिथयश कवीची एखादी रुचलेली भावलेली छान कविता शोधून ठेवा.
कार्यक्रम FB LIVE केला जाईल.
अधिक माहितीसाठी अस्मिता तडवळकर (+65-81686142) यांच्याशी संपर्क साधावा.
सस्नेह, - म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699