• Home
  • Swaragandha Diwali Program Music Auditions - स्वरगंध दिवाळी कार्यक्रम निवड चाचणी

Swaragandha Diwali Program Music Auditions - स्वरगंध दिवाळी कार्यक्रम निवड चाचणी

  • Sun, October 04, 2020
  • 12:00 PM
  • Online

Registration


Registration is closed


! स्वरगंध चाचणी - दिवाळी विशेष !

सप्रेम नमस्कार!

आपले मंडळ दर् वर्षी ज्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते, तितक्याच उत्साहात आपण दिवाळीसाठी एखादा संगीतमय कार्यक्रम आयोजित करतो, आणि दिवाळी दिवशी एकत्र फराळ आणि जेवण करतो. सद्यपरिस्थिती बघता जरी मोठ्या संख्येने एकत्र भेटता येणे शक्य नसले तरी, आपण आपला संगीत कार्यक्रम नक्कीच करू शकू.

गणेशोत्सवात आपण सर्व कार्यक्रम “online” प्रक्षेपित केले आणि सर्व रसिकांनी एकाच वेळी आपापल्या घरी बसून त्यांचा आनंद घेतला. ह्याच माध्यमाचा उपयोग करून आता आपण संगीत कार्यक्रम करायचे योजले आहे. दरवर्षी प्रमाणे दिवाळीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आपण प्रक्षेपित करू.

  • ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी  इच्छुक गायक व वादकांनी आपली नावे मंडळाच्या वेबसाईट वर रविवार  ४ ऑक्टोबर, दुपारी १२:०० पर्यंत नोंदवावी.
  •  गायकांनी एखाद्या मराठी चित्रपट गीताचे / भाव-गीताचे आपल्या आवाजात video रेकॉर्डिंग पण आम्हाला ४ ऑक्टोबर दुपारी १२:०० पर्यंतपाठवावे. फक्त मुखडा पुरेसा आहे. Video रेकॉर्डिंग इथे upload करा.
  • साथीला तानपुरा घेतला तर चालेल.
  • कृपया कराओके (karaoke) वापरू नका! कराओके वर गाऊन पाठवलेले ट्रॅक ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • इच्छुक वादक कलाकारांनी आशिष पुजारी (+65 92706100 president@mmsingapore.org) ह्यांना संपर्क करावा.
  • कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी मंडळाचे सभासद असणे गरजेचे आहे.
  • तसेच २४ ऑक्टोबर पासून दिवाळी पर्यंतच्या सर्व शनिवार व रविवारी रेकॉर्डिंगसाठी व त्याआधी तालमींसाठी उपलब्ध असणे गरजेचे आहे.
  • सहभागासाठी किमान वयोमर्यादा वय वर्षे १५ आहे.

अधिक माहितीसाठी आशिष पुजारी (+65 92706100 president@mmsingapore.org) ह्यांना संपर्क करावा.

सस्नेह,

कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर)

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software