कोविडोत्तर जगात अनेक संस्थांनी / कलाकारांनी online माध्यमातून आपली कला जगासमोर आणली. महाराष्ट्र मंडळ याला अपवाद नाही. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने नुकताच एक अनोखा प्रयॊग सादर केला - लॉकडाऊनमधील लॉक्ड डाऊन लोकांची लॉक डाऊन वरची एकांकिका. खास Online सादरीकरणासाठी लिहीलेली, बहुदा, मराठीतील पहिलीच! महाराष्ट्र मंडळ सिंगापूर साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मंडळाच्या नाट्यरंग उपक्रमातून चालना मिळालेली ही पहिलीच ‘सबकुछ म.मं.सिं. सभासद’ निर्मिती.
त्याचा पहिला प्रयोग २६ सप्टेंबर रोजी झाला. त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याची सर्व प्रसिद्धीमाध्यमे दखल घेत आहेत, कौतुक करत आहेत. दुसरा प्रयोग करावा अशी जोरदार मागणी आल्याने खास हा दुसरा प्रयोग आयोजित करत आहोत. आधीच्या प्रयोगासारखा हा ही प्रयोग LIVE असेल.
तर सादर करीत आहोत: लॉकडाउनच्या पोळ्या - प्रयोग दुसरा !
स्वप्ना मिराशी आणि गौतम मराठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, तुमच्या - आमच्या, कुणाच्याही घरात घडू शकेल, अशी ही कथा. थोडसं हसवत, थोडेसे चिमटे काढत अलगद तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणार आहे, शनिवार ऑक्टोबर १७ रोजी सिंगापूरच्या दुपारी ४:३० वाजता.
प्रयोग LIVE आहे त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग युट्युब व फेसबुक वर नंतर उपलब्ध नसेल. तरी लक्षात ठेवून वेळ काढून सहकुटुंब बघा. तसेच देशविदेशातील तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना देखील सांगा. देशविदेशातले कोणीही नोंदणी करून हा प्रयोग पाहू शकतात.
पण लक्षात असू द्या, लिंक केवळ नाव नोंदवलेल्यांनाच मिळेल. एका घरातून एक रजिस्ट्रेशन केले तरी बास आहे. रजिस्ट्रेशन झाल्या झाल्या तुम्हाला कन्फर्मेशन मेल मध्ये हा प्रयोग पाहण्याची लिंक मिळेल. तेव्हा लगेच मेल (स्पॅम सुद्धा) तपासून पहा. लिंक न मिळाल्यास pro@mmsingapore.org ला लगेच लिहावे ही विनंती !
पहिल्या प्रयोगानंतरच्या तज्ज्ञांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया व लॉकडाउनच्या पोळ्या टीम बरोबरची नाटकाच्या प्रक्रियेबद्दलची चर्चा इथे बघता येईल.
Lockdownchya Polya in media:
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699