• Home
  • MMS Ganeshotsav 2021 - Vividha-Gunadarshan : Inviting Entries

MMS Ganeshotsav 2021 - Vividha-Gunadarshan : Inviting Entries

  • Wed, August 04, 2021
  • 9:00 AM
  • Tue, August 24, 2021
  • 11:59 PM
  • Online

Registration

  • Please register the team leader first - a performing member or non-performing lead. Team leader will be the point of contact for your group.

    Please add names of all other performers in the appropriate column.

    For children below 5 years - Only Group Entries are allowed and either of the parents should be a member.

    For age group 5 years and above - all performers should be a MMS member.

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र मंडळ सिंगापुर आयोजित गणेशोत्सव २०२१ अंतर्गत आपल्याला विविध नात्यांवर आधारित कार्यक्रम सादर करायचे आहेत. हे कार्यक्रम कुठल्या न कुठल्या नात्यावर आधारित असले पाहिजेत. कार्यक्रमाचे सादरीकण उत्सवाच्या वातावरणाला अनुरूप असावे. मग ते नृत्य असो, गीत असो  वा नाट्यछटा. या संदर्भातली माहिती पुढीलप्रमाणे -

“नाते” हा शब्द सर्वसमावेशक आहे. नाते हे केवळ रक्ताचे नसून त्याला अनेक कंगोरे आहेत. आई, वडील, भावंडं, आणि त्या पलीकडची नाती गाण्यात वर्णन केल्या प्रमाणे, जसे भक्ताचे परमेश्वराशी असलेले नाते, गुरु शिष्याचे नाते, मैत्रीचे नाते, कर्मचारी वरिष्ठ यांचे नाते, तसेच मंडळाचे आणि सभासदांचे आपुलकीचे नाते,  बरेचदा ही नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा गहिरी होत जातात, शेवटी अंतरीची खूण पटणे हे महत्वाचे नाही का? सर्वात अलौकिक नाते आत्म्याचे परमात्म्याशी असलेले, यालाच तादात्म्य पावणे असेही म्हणतात. 

सहभागाचे नियम :

  • आपले सादरीकरण नाते या विषयावर असावे. 
  • सहभागासाठी मंडळाचे सभासद असणे अनिवार्य आहे.
  • वर्षाखालील मुलांच्या सहभागासाठी किमान एका पालकाने सभासदत्व असणे आवश्यक आहे.  ५ वर्ष खालील मुलांचे वैयक्तिक कार्यक्रम  (Solo performance) टाळावे.
  •  वर्ष आणि वर्षवरील मुलांच्या सहभागासाठी त्यांनी मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे.
  • आपल्या सादरीकरणाचा एक व्हिडीओ आपल्याला घरीच रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायचा आहे. 
  • हा व्हिडीओ ५ मिनिटांवर नसावा  
  • चित्रीकरण स्पष्ट आणि चांगल्या दर्जाचे असावे.
  • आपले चित्रीकरण पुरेश्या उजेड असलेल्या ठिकाणी करावे. 
  • फोन चा मुख्य कॅमेरा रेकॉर्डिंग साठी वापरावा. 
  • सादरीकरणासाठी शांतता असावी (बॅकग्राऊंड मध्ये पंखा,AC किंवा तत्सम आवाज नसावेत) 
  • चित्रीकरण करताना चेहरा स्क्रीन च्या मधोमध असावा, फोन landscape मोड मध्ये ठेवावा. 
  • नाट्यछटा (मोनोलॉग) : ५ मिनिटे किंवा नाट्यप्रवेश (scene) : १० मिनिटे. 
  • ग्रुप कार्यक्रमातील कलाकारांनी एकत्र येऊन विडिओ रेकॉर्ड करावा अथवा स्वतःच वैयक्तिक विडिओ तयार करून ग्रुप प्रमाणे merge करून मंडळाकडे पाठवावा. हे सर्व social distancing चे नियम पाळून करावे
  • तुमच्या व्हिडीओला प्रदर्शित कारण्यासंदर्भात मंडळाचा निर्णय अंतिम  राहील याची नोंद घ्यावी
आपल्याला काही प्रश्न असल्यास कृपया जुईली वाळिंबे @82917859, मिनल साटम @88209835, मानसी मराठे @82084985 आणि प्रिया म्हैसाळकर @83228788 यांच्याशी संपर्क साधावा. 

    नावनोंदणीची शेवटची तारीख १५ ऑगस्ट आहे. नावनोंदणीच्या वेळी तुमच्या कार्यक्रमाची गाणी, ग्रुप प्रमुखाचे नाव, दूरध्वनी क्रमांक आणि साधारण आराखडा द्यावा. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ग्रुपचे नावही नमूद करावे. दोन कार्यक्रमात सारखी गाणी आल्यास प्रथम नोंदणी केलेल्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येईल. १५ ऑगस्ट नंतर दोन दिवसात आम्ही तुम्ही दिलेल्या सभासदाला संपर्क करू आणि काही बदल असल्यास सांगू.

    आपले फायनल व्हिडीओज आम्हाला ३१ ऑगस्ट पर्यंत पाठवावे. फायनल व्हिडीओज तांत्रिक दृष्टीने आणि सर्व प्रकारे पूर्ण करून पाठवावेत. या तारखेनंतर पाठवले गेलेले व्हिडीओज स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. व्हिडिओ पाठवण्याची लिंक आम्ही ऑगस्ट १५ नंतर प्रसिद्ध करू. 

    मंडळी , लवकरात लवकर आपले “नाते” या संकल्पनेवरचे व्हिडीओज आम्हाला पाठवा. आणि सज्ज व्हा, मंडळाच्या आणि आपल्या ऋणानुबंधनाचा उत्सव साजरा करण्यासाठी!

    आपली,

    ममंसि कार्यकारिणी



    Download Member's App
    IOS Android

    Maharashtra Mandal (Singapore)

    Established 1994 | UEN S94SS0093G

    138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

    Powered by Wild Apricot Membership Software