नमस्कार मंडळी,
विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन - ‘संवाद एक चर्चासत्र’ या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चा पुष्प आपण समाजसेवक, शिक्षण क्षेत्र अभ्यासक, समुपदेशक, लेखक, विचारवंत, राष्ट्रीय अपंग सेवा पुरस्कार प्राप्त श्री. यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी संवाद साधून वाहणार आहोत.
तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४:०० वाजता!
श्री. यजुवेंद्र महाजन यांनी स्थापन केलेली दीपस्तंभ फाऊंडेशन ही सामाजिक संस्था देशातील पहिली संस्था आहे जिथे दिव्यांग, अनाथ, आदिवासी, गरीब होतकरू मुलांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, कौशल्य विकास या साठी मोफत निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. संस्थेच्या मनोबल या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण प्राप्त शेकडो दिव्यांग आज स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून राज्य आणि देश पातळीवर प्रशासकीय सेवेत रुजू आहेत. श्री. यजुवेंद्र महाजन यांचे हे कार्य समाजातील दुर्लक्षित होतकरूंना अशीच प्रेरणा देत राहो या सदिच्छा!
चला तर मग आपणही प्रेरणा घेऊया आभाळा एवढ्या उत्तुंग, सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व - श्री. यजुर्वेंद्र महाजन यांच्या कडून.
हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर सादर केला जाईल. कार्यक्रमात हजार राहण्या साठी खाली लिंक वरून register करा.
सस्नेह
- म. मं. सिं. कार्यकारिणी
धन्यवाद!!!
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699