• Home
  • मिश्किली आणि कविता - हास्यकवी अशोक नायगावकर

मिश्किली आणि कविता - हास्यकवी अशोक नायगावकर

  • Thu, November 04, 2021
  • 4:00 PM
  • ZOOM
  • 22

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी, 

मराठी साहित्यात कविता या साहित्य प्रकाराला मानाचे स्थान आहे. अनेक उत्तमोत्तम रचना मराठीत होत असतात.  हास्यकविता हा त्यातील एक लोकप्रिय प्रकार आणि त्यात आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारे  रसिकांचे उदंड प्रेम लाभलेले कवी आहेत श्री अशोक नायगावकर. सहज सोप्या रचना हे त्यांचे वैशिष्ट्य आहेच , परंतु त्यांची सादर करण्याची शैली मनोरंजक असल्यामुळे कविता केवळ ऐकतानाच नाही तर पाहताना ही एक वेगळीच मजा येते. आजच्या काळात जिथे साधं स्मितहास्य ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे तिथे श्री अशोक नायगावकर आपल्या खुमासदार शैलीने रसिकांना खळखळून हसवण्याचे फार मोलाचे काम करत आहेत. 

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करत आहेत खास दिवाळीनिमित्त, फराळासारखाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक खमंग आणि खुसखुशीत "हास्यकवी अशोक नायगावकर" यांचा धमाल कवितांचा आणि मिश्किल गप्पांचा कार्यक्रम. गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता झूम वर पाहता येईल

तेव्हा मंडळी, आपल्याला या हास्यरसात सामील व्हायचे असेल तर त्वरित दिलेल्या लिंक वरून रजिस्टर करा आणि आणि आनंद घ्या.


सस्नेह 

- म. मं. सिं. कार्यकारिणी

धन्यवाद!!!

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software