नमस्कार मंडळी,
विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन - ‘संवाद : एक चर्चासत्र’ या उपक्रमाअंतर्गत पुढील चर्चापुष्प आपण अष्टपैलू लेखक, अभिनेते व वरिष्ठ सल्लागार श्री. दीपक करंजीकर यांच्याशी त्यांनी लिहलेल्या "घातसूत्र" या प्रसिद्ध पुस्तकावर संवाद साधून वाहणार आहोत.
तर मग राखून ठेवा ही वेळ - रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता!
"घातसूत्र ही कादंबरी नाही इतिहास नाही अर्थशास्त्रीय - राजकीय ग्रंथ नाही. निबंध नाही प्रबंध नाही तत्वज्ञान नाही प्रवचन नाही किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन ही नाही. त्यांनी ह्या सर्व पलीकडे नेणारा चित्तथरारक सर्वंकष आणि व्यासंगी उद्बोधन करणारा ग्रंथ लिहिला आहे. हे लेखन कुठल्याही ग्रंथशाखेत मोडत नसले तरी त्यात, इतिहास, भूगोल अर्थकारण, राजकारण समाजकारण रहस्यमयतेने येते." - कुमार केतकर
हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल. कार्यक्रमात हजार राहण्या साठी खाली लिंक वरून नोंदणी/Register करा.
सस्नेह
- म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699