• Home
  • “साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प

“साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प

  • Mon, February 28, 2022
  • 9:30 PM
  • Singapore
  • 16

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

 मागील वर्षात महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने अनेक उपक्रम राबवले, सर्वच उपक्रमांना आपण भरभरून प्रतिसाद दिलात, “नभ उतरू आलं” च्या रूपाने आपण सलग ५० दिवस पाऊस या विषयावर संगीत आणि नृत्याचा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या राबवला. याच धर्तीवर आम्हाला आपल्यापैकी अनेकांनी आणखी एक असाच उपक्रम करता येईल का? यासंबंधी विचारणा केली.  

आपला उत्साह पाहून, मंडळाने नवीन वर्षात एक नवा ऑनलाईन उपक्रम करण्याचे ठरवले आहे. “साहित्य तारांगण” असे या उपक्रमाचे नाव आहे. मराठी साहित्य हा मराठी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ते पुस्तक विकत घेणे असो, किंवा पुस्तकांविषयी चर्चा असो आपण कायमच त्यात रस घेत आलो आहोत. अगदी मराठी साहित्य संमेलनांना देखील उदंड प्रतिसाद मिळतो. अशा मराठी रसिकांसाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी. आपल्या आवडत्या आणि प्रसिद्ध कवी/लेखकांचे साहित्य आपल्याला वाचायचे आहे. 

 या उपक्रमाविषयी थोडक्यात 
  • आपल्याला लेखकांची आणि कवींची एक यादी देण्यात येईल (यादी सोबत जोडली आहे)

  • या यादीतील लेखक किंवा कवी निवडून आपल्याला त्यांची एक रचना किंवा लेख यांचे वाचन करायचे आहे. 

  • या यादीतील सर्व कवी आणि लेखकांचे किमान एक साहित्य वाचले जावे म्हणून, एकदा निवड केलेला साहित्यिक पुन्हा निवडता येणार नाही, म्हणजेच एका साहित्यिकाचे एकच साहित्यवाचन होईल. 

  • आपण जेवढी लवकरात लवकर निवड कराल, तसे आपल्याला निवड करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होतील. 

  • या यादीतील साहित्यिक प्रथितयश असल्यामुळे त्यांचे साहित्य सहज उपलब्ध होईल अशी आशा आहे.

  • आपल्या व्हिडीओ ची वेळमर्यादा कवितेसाठी २ मिनिटे आणि गद्य उताऱ्यासाठी ५ ते ८ मिनिटे आहे. 

  • आपला आवाज स्पष्ट असावा, आणि व्हिडीओ लँडस्केप मोड मध्ये, पुरेश्या उजेडात चित्रित करावा. 

  • आपले व्हिडीओ आम्हाला लवकरात लवकर पाठवून द्यावे. 
 मंडळी, प्रथम नोंदणी करणाऱ्यांस प्राधान्य आणि व्हिडिओ ची गुणवत्ता या निकषांवर व्हिडीओ स्वीकारण्यात येतील. तेव्हा आपल्या आवडत्या साहित्यिकाची निवड त्वरित करावी ही विनंती. 

सोबत दिलेल्या लिंक वरून नावनोंदणी आणि साहित्यिकांची निवड करावी. आपले साहित्य वाचनाचे व्हिडीओ मंडळाच्या युट्युब चॅनेल वरून प्रसारित केले जातील. 

अधिक माहिती साठी जुईली वाळिंबे @82917859 ह्यांच्याशी संपर्क करा.

सस्नेह 

 म मं सिं कार्यकारणी


लेखक

 

कवी 


दुर्गा भागवत 

कुसुमाग्रज 

गौरी देशपांडे 

इंदिरा संत 

अनिल अवचट 

बा भ बोरकर 

रणजित देसाई 

मंगेश पाडगावकर 

विश्वास पाटील 

भा रा तांबे 

व्यंकटेश माडगूळकर 

आरती प्रभू 

शिरीष कणेकर 

ना धो महानोर 

कविता महाजन 

ग्रेस 

मीना प्रभू 

सौमित्र 

व पु काळे 

संदीप खरे 

प्रकाश नारायण संत 

सुरेश भट 

श्री ना पेंडसे 

वसंत बापट 

जयवंत दळवी 

नारायण सुर्वे 

विजय तेंडुलकर 

बालकवी 

गो नि दांडेकर 

बहिणाबाई चौधरी 

मिलिंद बोकील 

केशवसुत

बाबासाहेब पुरंदरे 

विंदा करंदीकर 

जी ए कुलकर्णी 

शांता शेळके 



 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software