• Home
  • म. मं. सिं. गीतरामायण चित्रीकरण प्रसारण

म. मं. सिं. गीतरामायण चित्रीकरण प्रसारण

  • Tue, November 29, 2022
  • Sat, December 17, 2022
  • MMS Youtube Channel

Registration

  • 2 Days Rent GeetRamayan

Registration is closed

म. मं. सिं गीतरामायण - चित्रीकरण प्रसारण
माध्यम: म. मं. सिं YouTube
नोंदणी शुल्क: केवळ S$10
ट्रेलर - https://youtu.be/DJRBGsLaLds
नोंदणी साठी लिंक - https://mmsingapore.org/event-5058971
नोंदणी केलेल्या सदस्यांना मंडळाकडून दोन दिवसांसाठी व्हिडिओ Access दिला जाईल.
या वर्षी आपल्या मंडळाच्या सदस्यांची दिवाळी विशेष ठरली. मंडळाकडून अनेक सुंदर उपक्रम होते आणि त्यातीलच एक सुश्राव्य, अप्रतिम सांघिक कार्याचे उदाहरण ठरला तो म्हणजे गीत रामायणाचा प्रयोग.
शेकडो श्रोत्यांनी प्रत्यक्ष हा दैदिप्यमान कार्यक्रम अनुभवला आणि त्या बद्दल आम्हाला छान प्रतिक्रिया देखील दिल्या.
काही कार्यक्रम हे प्रत्यक्ष अनुभवायचे असतात आणि आपल्या सभासदांनी सादर केलेला गीत रामायण देखील त्यांपैकीच!
SOTA येथील भव्य दिव्य सभागृहात सादर झालेला हा कार्यक्रम काही कारणांमुळे आपल्या पैकी काही रसिक श्रोत्यांना अनुभवता आला नव्हता, तसेच काही सदस्यांनी हा कार्यक्रम परत बघता येईल का अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी मंडळाकडे या कार्यक्रमाची चित्रफीत असेल तर ती प्रसारित करता येईल का अशी विचारणा केली आहे.
मंडळाने या साठी विशेष तरतूद करून चित्रफीत संकलित केली आहे.
आपल्या आग्रहास्तव आम्ही ही चित्रफीत माफक शुल्क आकारून प्रसारित करणार आहोत.
तर मग निश्चितच आपण देखील आपल्या मित्र परिवारासह ह्या संधीचा लाभ घेऊ शकता.
तर अवश्य नोंदणी करा.
सस्नेह,
म. मं. सिं कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software