• Home
  • Stall Registration - आनंद मेळावा 2023

Stall Registration - आनंद मेळावा 2023

  • Sat, November 11, 2023
  • 3:00 PM - 5:00 PM
  • GIIS Punggol
  • 12

Registration


Registration is closed
नमस्कार मंडळी, 

यावर्षीच्या दिवाळी उत्सवामध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलं आहे, जिथे आपण मंडळातील गृहिणींनी बनवलेल्या रुचकर पाककृतींचा सशुल्क आस्वाद आपण घेऊ शकता. या आनंद मेळाव्यामध्ये तुम्हाला स्टॉल लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सशुल्क नावनोंदणी करायची आहे.

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे. 

दिवस: 11 नोव्हेंबर 2023 (शनिवार)

आनंद मेळावा वेळ: दुपारी 3:00 ते 5:00

नोंदणीची शेवटची तारीख बुधवार, 8 नोव्हेंबर 2023

नोंदणी शुल्क -  S$ 50.00

ठिकाण: GIIS Punggol


महत्वाच्या सूचना 

१. आनंद मेळाव्यामध्ये स्टॉल लावणाऱ्या  गृहिणींना / सभासदांना नोंदणी करणे बंधनकारक आहे.

२. स्टॉल लावण्यासाठी म.मं.सिं. चे सभासदत्व असणे आवश्यक आहे. 

३. स्टॉल खाद्यपदार्थांचा, पेयांचा किंवा इतर सेवांचा (उ. टॅटू, मेंदी, नेल-आर्ट) असू शकतो. 

४. एका स्टॉल वर जास्तीत जास्त २ खाद्य पदार्थ अथवा इतर एक सेवा ठेवावी. त्यापेक्षा जास्त काही ठेवू नये. तसेच नावनोंदणी करताना जो पदार्थ, किंवा सेवा तुम्ही ठरवली असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली नोंदणीची रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या कुठल्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. 

५. तुम्ही नोंदवलेला पदार्थ, सेवा किंवा खेळ दुसऱ्या कोणी तुमच्या आधी नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू. 

६. दिवाळी विशेष कार्यक्रम दुपारी 2:00 वाजता सुरु होईल. "आनंद मेळावा" हा कार्यक्रम दुपारी 3:30 वाजता सुरु होईल याची नोंद घ्यावी.

७. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.


चला तर मग लवकरात लवकर तुमच्या स्टॉलची नोंदणी करा. 

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software