MMS संवाद: क्रिकेट - सराव, सातत्य आणि संधी - श्री. चेतन सूर्यवंशी
नमस्कार मंडळी,
2023 च्या क्रिकेट विश्वचषकाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कुठला संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणार याबद्दलचे अंदाज अफगाणिस्तान आणि नेदरलँड सारख्या नवख्या संघानी साफ चुकवून एक वेगळीच चुरस निर्माण केली आहे. चार वर्षांनी येणाऱ्या या क्रिकेट विश्वचषकाचे आणि दिवाळीचे औचित्य साधत "विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र” या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चापुष्पात आपण संवाद साधणार आहोत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटपटू श्री. चेतन सूर्यवंशी यांच्याशी.
मराठी माणूस हा पहिल्यापासूनच क्रिकेटवेडा! दि.ब. देवधरांपासून आजकालच्या अजिंक्य रहाणेपर्यंत शेकडो मराठी युवकांनी भारतीय क्रिकेटची धुरा वाहिली. गावस्कर आणि तेंडुलकर तर त्या मांदियाळीतील शहेनशहा! तसे पहिले तर क्रिकेटचे कौशल्य बऱ्याच जणांकडे असते. पण खेळाडूला यशस्वी होण्यासाठी गरज असते सराव सातत्य आणि संधी या त्रिसूत्रीची. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सिंगापूरच्या क्रिकेट टीम चे माजी कर्णधार श्री. चेतन सूर्यवंशी यांस. सिंगापूर टीम मधून खेळण्यासोबतच श्री. सूर्यवंशी यांना महाराष्ट्र क्रिकेट टीम आणि IPL मधील नावाजलेल्या KKR टीम मधून खेळण्याचा सखोल अनुभव आहे. भारत देशाबाहेरच्या क्रिकेट विश्वात मराठी झेंडा फडकावणाऱ्या श्री. सूर्यवंशी यांचे मनोगत ऐकण्यास आपण सगळे क्रिकेटप्रेमी आणि त्याचबरोबर होतकरू तरुण क्रिकेटपटूही उत्सुक असणार याची आम्हाला खात्री आहे. कारण मराठी माणसासाठी क्रिकेट हा खेळण्याइतकाच बोलण्याचाही विषय आहे - नाही का?
आपल्या या संवादाची वेळ आहे - सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:00 वाजता!
मुलाखतकार - सौ. प्रियंका नगरकर
हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल तसेच फेसबूक वर देखील प्रसारित केला जाईल.
या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा.
सस्नेह,
म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699