म.मं.सिं. स्वातंत्र्य परिचय ट्रेक
नमस्कार उत्साही मित्र मैत्रिणींनो,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आयोजित करत आहे म. मं. सिं स्वातंत्र्य परिचय ट्रेक
भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्या तीन पुढाऱ्यांनी - सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू - महत्वाची कामगिरी बजावली त्यांची स्मारके आपल्या सिंगापुरात पण आहेत आणि ती ही अगदी जवळ जवळ. ऐकून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग या स्मारकांना भेट देऊ या. आणि भटकत भटकत फोर्ट कॅनिंग पण पाहूया. काय रहस्ये दडली आहेत या शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन किल्ल्यात? ते ही जाणून घेऊ या. आणि सकाळी उठून ही भटकंती करता करता व्यायामाचे महत्व समजावून घेत आपल्या आयुष्याला बैठ्या जीवनशैलीपासून स्वातंत्र्य मिळवून देऊ या.
सविस्तर माहिती:
ट्रेकिंग मार्ग : पाडांग, आझाद हिंद सेनेचे स्मारक, गांधी स्मारक, नेहरू पुतळा, क्लार्क की, फोर्ट कॅनिंग
मीटिंग पॉइंट: रॅफल्स प्लेस MRT
तारीख: रविवार २८ जुलै २०२४ सकाळी 7.00 AM SGT (शार्प)
अपेक्षित समाप्तीची वेळ: ९:३०
तयारी विषयक माहिती:
1. कंफर्टेबल ट्रेकिंगचे कपडे आणि शूज
2. पाण्याची बाटली (१ लिटर दरडोई)
3. पोंचो / रेन जॅकेट
4. हवाबंद डब्यात पॅक केलेला नाश्ता (पर्यायी) त्या व्यतिरिक्त मंडळाकडून देखील अल्पोपहार व्यवस्था केली जाईल!
5. रुमाल / नॅपकीन
6. कपड्यांचा दुसरा संच . (पर्यायी)
कृपया खालील लिंकवर नोंदणी registration करावे!
https://www.mmsingapore.org/event-5798942
Members Ticket - Free
Non Members : SGD 10
वयोगट: ८ वर्ष + Renew/ Apply membership on below link: https://www.mmsingapore.org/apply-renew
विशेष उल्लेख: हा ट्रेक आपण Trekkers@heart च्या सहकार्याने आयोजित करत आहोत!
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699