नेत्र रक्षा वर्ग
नमस्कार मंडळी,
डोळे - पाच इंद्रियांपैकी एक, आपल्या शरीरातील एक संवेदनशील आणि नाजूक अवयव.. आजच्या या तांत्रिकदृष्ट्या प्रगत झालेल्या जगात आपण सगळेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी वेढले गेलो आहोत.. कितीही ठरवलं तरी फोन, लॅपटॉप, आय-पॅड, टेलिव्हिजन या शिवाय गत्यंतर नाही.. मग याचा सगळ्यात जास्त अपाय होत असेल तर तो आपल्या नाजूक आणि महत्वाच्या अवयवाला.. आपल्या डोळ्यांची निगा राखणं हे आपलच कर्तव्य आहे, नाही का?
मंडळी, याच अनुषंगाने, आपलं मंडळ Yogapoint Singapore च्या सहयोगानं घेऊन येत आहे "नेत्र रक्षा वर्ग".. योगाचार्य, डॉ. विश्वास मंडलिक आपल्याला या कार्यशाळेमध्ये आपली दृष्टी तेजोमय करण्यासाठी मार्गदर्शन करतील.. आपल्या कार्यशाळेचे मार्गदर्शक हे भारत सरकार द्वारा सन्मानित आहेत. 2018 मध्ये त्यांना “Prime Minister’s Award for outstanding contribution towards promotion and development of YOGA” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आम्हाला विश्वास आहे की जास्तीत जास्त सभासद या कार्यशाळेचा लाभ घेतील..
दिवस - १८ ऑगस्ट २०२४
वेळ - सकाळी ९ तो १०.३०
माध्यम - Zoom द्वारे
विशेष नोंद - हा वर्ग (कार्यशाळा) फक्त मंडळाच्या विद्यमान सभासदांसाठी आयोजित केली आहे.
भेटूयात मग.
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699