महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) प्रस्तुत,
मराठी नाट्यसंगीत म्हणजे गाण्यात गुंफलेली एक अनोखी नाट्यकथा, जिथे प्रत्येक सूरात एक कथा साकारते आणि प्रत्येक गीतात भावना उलगडतात. नाट्यसंगीताने मराठी रंगभूमीला एक वेगळी ओळख दिली, ज्यामुळे लोकांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली आणि मराठी रंगभूमीला एक समृद्ध वारसा मिळाला. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या परंपरेने मराठी रंगभूमीला एक मंत्रमुग्ध करणारा सूर दिला. मराठी नाट्यसंगीत हे फक्त मनोरंजन नसून, ते श्रोत्यांना मनाला छेडणारी संगीतमय अनुभूती देते, जी आजही तेवढीच ताजी आहे.
तर तुम्हा सर्व संगीत प्रेमींसाठी आपलं मंडळ घेऊन येत आहे सुप्रसिद्ध मराठी नाट्य गीतांचा नजराणा...
वैभव नाटय संगीताचे !
पाहुणे कलाकार
ह.भ.प. डॉ.चारुदत्त महाराज आफळे
डॉ. चारुदत्त गोविंद आफळे हे एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि गायक/अभिनेते आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पलुस्कर पुरस्कार, गोवा माशेल संघाकडून सुवर्णपदक, सन २००३ साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अजून कित्तेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.
साथिदार
दिवस: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024, संध्याकाळी 7:00 वाजता
स्थळ: SIFAS Annexe, 3 Race Course Lane, Singapore 218731
तिकिटाचा दर खालीलप्रमाणे
Members (Adult/Child) - SGD 15.00
Non-members (Adult/Child) - SGD 30.00
सशुल्क भोजन व्यवस्था - SGD 15.00
तर मंडळी, या उत्कृष्ट संगीत मेजवानीचा आस्वाद घ्यायला नक्कीच या. सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as the ticket cancellation/modification option is not available.
* महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा किंवा पुन्हा नियोजित करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699