नमस्कार मंडळी,
आपल्या जीवनातील सर्जनशीलतेचं, भक्तीचं आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक असलेल्या बाप्पाचं आगमन आपण दरवर्षी जल्लोषात आणि कलात्मक सादरीकरणातून करत असतो.
याच परंपरेला पुढे नेत, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यंदाही घेऊन येत आहे — "विविध गुणदर्शन २०२५ (VVG)" — आपल्या सर्वांसाठी एक बहुरंगी, बहुरूपी कला महोत्सव!
या वर्षीच्या VVG कार्यक्रमाची संकल्पना आहे —
प्रवास मराठी सिनेसृष्टीचा ….!
मराठी चित्रपटसृष्टीचा हा प्रवास म्हणजे केवळ चित्रपटांचा इतिहास नाही, तर आपल्या संस्कृतीचा, सामाजिक बदलांचा आणि भावनांचा प्रवास आहे. प्रत्येक युगाने आपल्याला काहीतरी दिलं आहे — सुरेल गाणी, ठसकेबाज लावण्या, लोककला, तरुणाईची धग आणि विचार करायला लावणारे संदेश.
तर मंडळी, ह्या रंजक विषयाला साजेसं सांघिक सादरीकरण आपल्याला करायचं आहे — नृत्य, नाट्य, संगीत, लघुनाटिका, इ.
तुम्ही कोणतंही युग निवडू शकता आणि त्या काळातली कला, भावना किंवा विशिष्ट शैली सादर करू शकता.
कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणेः
तारीखः 13 सप्टेंबर 2025 (शनिवार)
वेळः सायंकाळी ४.00 वाजता
स्थळः GIIS Punggol
• नृत्य, संगीत, वादन, किंवा इतर प्रकारचे सादरीकरण सांघिक असावे.
• सादरीकरण मराठी भाषेत असावे.
• संघ प्रमुखाने आपल्या सादरीकरणाची नाव नोंदणी 25 ऑगस्ट पर्यंत करावी (यात गाण्याचे/ नृत्याचे नाव, प्रकार, सहभागी कलाकारांची नावे आणि संख्या यांचा अंतर्भाव करावा).
• जर दोन संघ एकाच गाण्यावर सादरीकरण करणार असतील तर सगळ्यात आधी नोंदणी करणाऱ्या संघाला ती संधी दिली जाईल, आणि दुसर्या संघाला मंडळाकडून वेगळ्या गाण्यावर सादरीकरण करण्याची विनंती केली जाईल.
• आपल्या कलाप्रकारासाठी लागणारी वेशभूषा, वाद्यसंच किंवा ध्वनिचित्रमुद्रण त्या त्या कलाकाराने/संघाने घेऊन येणे अपेक्षित आहे.
• प्रत्येक संघाला आपली कला सादर करण्याचा अवधी 3 ते 5 मिनटे असेल.
• कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांनी मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे.
• वयमर्यादा - किमान 5 वर्ष
• आपल्या कार्यक्रमाची ऑडिओ फाईल 31 ऑगस्ट पर्यंत आमच्याकडे द्यावी.
• सहभाग व सादरीकरणासंबंधित कोणत्याही बाबतीत मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
चला तर मग, आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना रंगमंचावर खुलवायला सज्ज व्हा!
अधिक वाट न पाहता सहभागी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीशी संपर्क साधा आणि नाव नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
अक्षता मोडक - 81603668
सुचित्रा जंगम - 9272 4541
दीप्ती हिर्लेकर - 88760367
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699