नमस्कार मंडळी,
१ मे २०२६ - महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे...
"महाराष्ट्राची खाद्य संस्कृती"
या वर्षीसुद्धा महाराष्ट्र प्रीमिअर लीग सोबत हा खाद्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी खाली नमूद केलेल्या महाराष्ट्रातील खाद्य पदार्थांचं प्रदर्शन करावं असा मंडळाचा मानस आहे.
2. आईच्या हातचं (पारंपरिक पाककृती)
3. खाऊगल्ली
4. मुख्य पदार्थ
कार्यक्रमाची माहिती:
️तारीख: शुक्रवार, 1 मे 2026 (सार्वजनिक सुट्टी)
वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 4:00
स्थळ: St. Patrick School, 490 East Coast Road, Singapore 429058
कार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक -
● स. 10:00 ते स. 11:00 - स्टॉल्सची नोंदणी व मांडणी
● स. 11:00 ते दु. 12:00 - प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शुभारंभ
● स. 11:00 ते दु. 4:00 - खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री
तर या वर्षीच्या "महाराष्ट्राची खाद्य संस्कृती" या कार्यक्रमात आपण सहभागी व्हायचं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती खालील प्रमाणे:
1. वरील नमूद केलेल्या खाद्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख - 19 एप्रिल 2026.
2. नावनोंदणी करताना ज्या पदार्थांचा स्टॉल उपलब्ध असेल फक्त त्या स्टॉल साठी तुम्ही नावनोंदणी करू शकता. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या पदार्थांची पुनरावृत्ती होऊ नये या हेतूने हा नियम ठेवला आहे.
3. या वर्षी सदस्य आणि सदस्येतर दोघांनाही स्टॉल लावण्याची परवानगी आहे. सदस्येतर स्टॉलधारकांकडून तात्पुरती ठेव रक्कम (Security Deposit) - $50 + $30 शुल्क आकारले जाईल. सदस्येतर स्टॉलधारकांसाठी ४ जागा राखीव असतील (पहिले येणाऱ्यास प्राधान्य)
सभासदत्व घेण्यासाठी येथे क्लिक करा. -
https://www.mmsingapore.org/sys/website/?pageId=18170
4. सभासदांसाठी स्टॉल नोंदणी करण्यासाठी तात्पुरती ठेव रक्कम (Security Deposit) - $50.
PayNow using this UEN: S94SS0093G
5. इतर प्रश्न असल्यास खालील समन्वयकांना WhatsApp द्वारे संपर्क साधावा
रेश्मा वैद्य: +65 82096563
दीप्ती हिर्लेकर: +65 88760367
सुचित्रा जंगम: +65 92724541
किंवा feedback@mmsingapore.org ला ई-मेल पाठवावी.
महत्वाची सूचना - तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमानंतर सात दिवसांच्या आत परत केली जाईल. जर नावनोंदणी करून काही कारणांमुळे आपणास स्टॉल लावणे शक्य झाले नाही, किंवा नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावण्यात आला, अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत केली जाणार नाही.
काही महत्वाचे नियम:
1. कार्यक्रमस्थळी स्वयंपाकाची परवानगी नसल्याने आपण ठरविलेले सगळे पदार्थ घरूनच बनवून आणावे. Electrical points/outlets strictly cannot be used. Please bring your own hot-cases, ice packs etc.
2. स्टॉल 3 फूट बाय 2 फूट टेबलावर मावेल असा असावा.
3. स्टॉल, सुरक्षितता व स्वच्छता यांचा विचार करुन लावलेला असावा.
4. स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाची जबाबदारी संपूर्णपणे स्टॉल लावणा-या व्यक्तीची राहील, मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
5. तुम्ही विकणाऱ्या पदार्थांचा विक्री दर अवास्तव नसावा हि विनंती गरज वाटल्यास समन्वयकांशी चर्चा करावी.
6. स्टॉल साठी प्रत्येकी 1 टेबल, 2 खुर्च्या मंडळातर्फे पुरविण्यात येतील, याव्यतिरिक्त लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था (उदा. टेबल-क्लॉथ, डिस्पोजेबल्स डबे, चमचे, सुट्टे पैसे) स्टॉलधारकांनी स्वतः करावी.
7. कृपया विक्रीसाठी आणलेले पदार्थ फक्त बंद डब्यातूनच द्यावे.
लवकरच नोंदणी करा आणि या खाद्य संस्कृतीच्या उत्सवात नक्की सहभागी व्हा!
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699