• Home
  • साहित्य सहवास - मराठी बोलीभाषा विशेष

साहित्य सहवास - मराठी बोलीभाषा विशेष

  • Sun, February 07, 2021
  • 2:30 PM
  • FB live via ZOOM

Registration

  • You need to be a new or renewed of 2021 or a life member to register. Kids below 18 need their own associate membership to participate.

Registration is closed

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या भौगोलिक वैशिष्ट्यांनी बनलेला आहे. तशीच विविधता आपल्याला मराठी भाषेत पाहायला मिळते. म्हणजे कोकणातली मराठी वेगळी तर देशाकडली आगळी. मराठी भाषेची हीच वैविध्यता आपण साहित्य सहवासच्या पुढच्या कार्यक्रमात साजरी करणार आहोत.

  • तुमच्या आवडीची मराठीची एखादी बोलीभाषा निवडा आणि त्या भाषेतील गोष्टी, लेख, किस्से, कविता म्हणजेच साहित्यातील कुठला ही प्रकार ३ ते ५ मिनिटांच्या अवधीत सादर करा.
  • सादरीकरणात भाषेची लकब, ठसका अपेक्षित आहे. भाषेची माहिती अथवा उगम याबद्दलचे साहित्य टाळा.
  • कार्यक्रमात सहभागी होण्यास मंडळाचे २०२१ चे सभासद असणे अनिवार्य आहे. सभासद नूतनीकरण केले नसल्यास इथे करा.
  • बोलीभाषेची निवड नोंदणी करताना लिहिणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कोणते साहित्य वाचणार आहात हे नक्की झाल्यावरच नावनोंदणी करा.
  • नावनोंदणी ऑनलाईन म.मं.सिं. वेबसाईटवर करा आणि साहित्य ई-मेलने sahitya@mmsingapore.org ला अथवा whatsapp मार्फत अस्मिता तडवळकर यांना +65 8168 6142 वर पाठवा.
  • ३ फेब्रुवारीपर्यंत तुमची नावनोंदणी व नोंदवलेले साहित्य आमच्यापर्यंत पोचले पाहिजे. त्यानंतर पोचलेले साहित्य व आलेल्या नावनोंदणीच्या विनंतीस मान दिला जाणार नाही.
  • ५ फेब्रुवारीपर्यंत कार्यकारिणी तुमच्या साहित्याचे परीक्षण करून तुमचा सहभाग पक्का झाल्याचे ई-मेल द्वारे तुम्हाला कळवेल. एकाच प्रकारचे खूप साहित्य आले असल्यास किंवा तुमच्या साहित्यनिवडीबद्दल आमच्या काही सूचना असल्यास ते ही कळवण्यात येईल. ही प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून लवकरात लवकर नावनोंदणी करून आम्हाला तुमचे नियोजलेले साहित्य पाठवा ही विनंती.
  • निवडीचा अधिकार म. मं. सिं. कार्यकारिणीकडे राखीव राहील.

हा कार्यक्रम ७ फेब्रुवारी ला मंडळाच्या facebook page वर LIVE प्रक्षेपित करण्यात येईल .

विविध मराठी बोलीभाषा -

  • https://marathiglobalvillage.com/marathi-bolibhasha/ 
  • https://www.facebook.com/sahityakalp/photos/a.323307495142454/897113414428523/

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software