• Home
  • MMS संवाद: एका उद्योजकाची यशोगाथा - हर्षवर्धन भावे

MMS संवाद: एका उद्योजकाची यशोगाथा - हर्षवर्धन भावे

  • Sat, July 22, 2023
  • 4:00 PM
  • ZOOM
  • 60

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,

श्रावण महिन्याच्या आगमनाचे औचित्य साधत "विचारांची देवाण-घेवाण आणि मार्गदर्शन- संवाद एक चर्चासत्र” या उपक्रमा अंतर्गत पुढील चर्चापुष्पात आपण संवाद साधणार आहोत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक श्री. हर्षवर्धन भावे  यांच्याशी.

मराठी माणूस आणि व्यवसाय हे समीकरण जुळत नाही ह्या परंपरागत समजूतीला काटछेद देणारी अनेक उदाहरणे आहेत. श्री. हर्षवर्धन भावे हे त्यापैकी एक ठळक उदाहरण. मुंबई उपनगरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरवात करून केवळ आपली गुणवत्ता आणि व्यावसायिक दृष्टिकोन या बळावर आंतरराष्ट्रीय व्याप्ती असणारा व्यवसाय उभ्या करणाऱ्या श्री. भावे यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असेल.


आपल्या या संवादाची वेळ आहे - शनिवारी दिनांक 22 जुलै  रोजी दुपारी 4:00 वाजता!

मुलाखतकार - सौ. वर्षा मंदार  

 

हा कार्यक्रम Zoom द्वारे सादर केला जाईल तसेच फेसबूक वर देखील प्रसारित केला जाईल.

या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा.
नोंदणी - https://mmsingapore.org/event-5350906

सस्नेह, 

म. मं. सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software