• Home
  • म.मं.सि. प्रवास - दिवाळी विशेष आणि आनंद मेळावा

म.मं.सि. प्रवास - दिवाळी विशेष आणि आनंद मेळावा

  • Sat, November 11, 2023
  • 2:00 PM
  • GIIS Punggol, L6, MPH
  • 182

Registration


Registration is closed

म.मं.सि. प्रवास - दिवाळी विशेष आणि आनंद मेळावा


नमस्कार मंडळी, 

दसरा झाला की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. मग घरोघरी, आकाश कंदील, किल्ल्यांची तयारी सुरु होते. घरातील वार्षिक सोपस्कार, म्हणजेच साफसफाईचं काम चालू होतं.

ह्या सगळ्या कामांसोबत महत्वाचं म्हणजे फराळ बनवण्याचं काम सुद्धा चालू होतं. 

आम्हाला खात्री आहे आपण सगळे दिवाळीच्या तयारीला लागला असाल, कारण आपली कार्यकारिणी सुद्धा तुमच्या साठी दिवाळीची मेजवानी घेऊन येण्यासाठी जोरात तयारीला लागली आहे. 

गेल्या वर्षीप्रमाणेच, मंडळाच्या दिवाळी उत्सवाची सुरुवात आकाश कंदील कार्यशाळेच्या आयोजनाने होईल. यासोबतच कार्यकारणी एक विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे. 

मंडळाने वर्षानुवर्षे कित्येक छान कार्यक्रम आपल्यासमोर आणले. यावर्षी तर मंडळाने कार्यक्रमांची चाळीशी गाठली आहे. प्रत्येक कार्यकारिणीने आणि भाग घेणाऱ्या कलाकारांनी कष्ट घेऊन आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. यावर्षी दिवाळी निमित्त आपण एका सुंदर चित्रफितीद्वारे मंडळाच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. मागील काही वर्षांमध्ये झालेल्या निवडक सादरीकरणांची झलक आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत, "म.मं.सि. प्रवास - दिवाळी विशेष" या कार्यक्रमाद्वारे

कार्यक्रमाच्या सादरीकरणा नंतर असणार आहे "आनंद मेळावा", जिथे मंडळातील गृहिणींनी / सभासदांनी बनवलेल्या रुचकर पाककृती व इतर सेवांचा सशुल्क आस्वाद आपण घेऊ शकता.

कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे. 

दिवस: 11 नोव्हेंबर 2023 (शनिवार)

वेळ: दुपारी 2:00 ते 5:00

ठिकाण: GIIS Punggol, L6, MPH


१. चित्रफीत सादरीकरण, दिवाळी फराळ आणि आनंद मेळावा Members: Free / Non Members: $10

२. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक आहे, फक्त नावनोंदणी केलेल्या मंडळींसाठी मंडळाकडून आयोजिलेल्या दिवाळी फराळाची व्यवस्था करण्यात येईल

३. ज्या गृहिणींना / सभासदांना आनंद मेळाव्यामध्ये आपल्या पाककृती व इतर सेवांचा स्टॉल लावायचा असेल त्यांसाठी नोंदणी शुल्क - $50.00

४. आनंद मेळाव्यामध्ये स्टॉल लावणाऱ्या  गृहिणींना / सभासदांना नोंदणी करणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे स्टॉल लावण्यासाठी म.मं.सिं. चे सभासदत्व असणे आवश्यक आहे. 

५. स्टॉल खाद्यपदार्थांचा, पेयांचा किंवा इतर सेवांचा (उ. मेंदी, नेल-आर्ट) असू शकतो. 


नावनोंदणी - https://mmsingapore.org/event-5470965/Registration

स्टॉल नोंदणी - https://mmsingapore.org/event-5470969

चला तर मग लवकरात लवकर नावनोंदणी करा आणि म.मं.सि. प्रवास - दिवाळी विशेष या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. 

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी 

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software