• Home
  • Shravansari 2024 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

Shravansari 2024 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

  • Tue, August 20, 2024
  • 6:00 PM - 9:00 PM
  • Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944
  • 45

Registration


Registration is closed

कार्यक्रम: श्रावणसरी (मंगळागौर पूजा, आरती, खेळ व स्नेहभोजन)

दिनांक: 20 ऑगस्ट 2024

वेळ: सायंकाळी 6 ते 9

स्थळ: Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529944.


नमस्कार मैत्रिणींनो,

सणांचा राजा, श्रावणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर पुन्हा एकदा घेवून येत आहे कार्यक्रम 'श्रावणसरी' .

उत्साह आणि आनंद यांची सांगड घालणारा, नव्या नवरीचा श्रावणात साजरा करण्यात येणारा एक सण म्हणजे ‘मंगळागौर’. 
मंगळागौरीची पूजा, पारंपरिक खेळ, हळदीकुंकूं आणि स्नेहभोजन या कार्यक्रमांचा आनंद तर घ्यायलाच हवा.

चला तर मग, तुमच्या नऊवारी साड्या आणि सुंदर पैठण्या नेसून झिम्मा, फुगडी, गोफ असे विविध खेळ खेळत या श्रावणसरीत चिंब होण्यासाठी नक्की या!

नवविवाहित तरुणींना मंगळागौरीची पूजा करण्याची इच्छा असेल तर मंडळाच्या समन्वयकांशी संपर्क साधा. 

शितल धारूरकर: +65 8189 7501
अमृता कुलकर्णी: +91 98222 14500


कार्यक्रमाची रूपरेषा:

संध्याकाळी 4:30 ते 6:00 - मंगळागौर पूजा व आरती 

संध्याकाळी 6:00 ते 8:00 - खेळ

संध्याकाळी 8:00 ते 9:00 - स्नेहभोजन


तिकीट दर:

म.मं.सिं. सभासद (मैत्रिणी) - $20

सभासदेतर (मैत्रिणी) (Non-Member) - $40

मुले (12 वर्षा खालील) - $15

५ वर्षाखालील मुलामुलींना तिकीट नाही.

तिकीट दरात जेवण समाविष्ट असून प्रत्येक तिकिटाला केवळ एकच बेन्टो बॉक्स मिळेल.

मर्यादित जागा! लवकरात लवकर तिकिटे नोंदवून टाका 

https://www.mmsingapore.org/event-5809149

सस्नेह,

आपली कार्यकारिणी

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software