• Home
  • विविध गुणदर्शन,२०२४ (संकल्पना: प्रेरणा) - सादरीकरणासाठी नाव नोंदणी

विविध गुणदर्शन,२०२४ (संकल्पना: प्रेरणा) - सादरीकरणासाठी नाव नोंदणी

  • Sat, September 14, 2024
  • 10:30 AM - 12:30 PM
  • GIIS Punggol

Registration

  • -

Registration is closed


नमस्कार मंडळी,

विद्याधिपती व कलाधीश असणाऱ्या गणरायाच्या आगमनाचा आनंद आपण दरवर्षी विविधप्रकारे आपले कलागुण सादर करत साजरा करत असतो. ह्या वर्षीही महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी हा विविध गुणदर्शन सोहळा साजरा करण्याची सुसंधी घेऊन येत आहे.

निसर्गामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधील बऱ्याच गोष्टी, बऱ्याच व्यक्ती आपल्याला या ना त्या प्रकारे प्रेरणा देत असतात.. मग आपले मित्र-मैत्रिणी असोत, प्रसिद्ध/यशस्वी व्यक्तिमत्वे असोत,समाज वातावरण असो किंवा आजूबाजूचा परिसर असो... सगळं काही आपल्याला स्फूर्ती देत असतं..

तर यावर्षीच्या आपल्या VVG कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे "प्रेरणा".. या विषयाला साजेसं सांघिक सादरीकरण तुम्हाला करायचं आहे..

कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणेः

तारीखः 14 सप्टेंबर 2024 (शनिवार)

वेळः सकाळी 10.30 वाजता

स्थळः GIIS Punggol


  • नृत्य, संगीत, वादन, किंवा इतर प्रकारचे सादरीकरण सांघिक असावे.
  • सादरीकरण मराठी भाषेत असावे.
  • संघ प्रमुखाने आपल्या सादरीकरणाची नाव नोंदणी 6 सप्टेंबर पर्यंत करावी (यात गाण्याचे/ नृत्याचे नाव, प्रकार, सहभागी कलाकारांची नावे आणि संख्या यांचा अंतर्भाव करावा).
  • जर दोन संघ एकाच गाण्यावर सादरीकरण करणार असतील तर सगळ्यात आधी नोंदणी करणाऱ्या संघाला ती संधी दिली जाईल, आणि दुसर्‍या संघाला मंडळाकडून वेगळ्या गाण्यावर सादरीकरणाची विनंती केली जाईल.
  • आपल्या कलाप्रकारासाठी लागणारी वेशभूषा, वाद्यसंच किंवा ध्वनिचित्रमुद्रण त्या त्या कलाकाराने/संघाने घेऊन येणे अपेक्षित आहे.
  • प्रत्येक संघाला आपली कला सादर करण्याचा अवधी 3 ते 5 मिनटे असेल.
  • यावर्षीच्या VVG साठी काही जागा शिल्लक असल्यामुळे सर्व कलाकारांना आपण दोन सादरीकरणात सहभागी होण्याची संधी देत आहोत.
  • कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांनी मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे.
  • वयमर्यादा - किमान 5 वर्ष
  • आपला प्रॅक्टिस चा व्हिडीओ 8 सप्टेंबर पर्यंत आम्हाला पाठवावा. तसेच आपल्या कार्यक्रमाची ऑडिओ फाईल 12 सप्टेंबर पर्यंत आमच्याकडे द्यावी.
  • सहभाग व सादरीकरणासंबंधित कोणत्याही बाबतीत मंडळाचा निर्णय अंतिम असेल.


तर अधिक वाट न पाहता सहभागी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकारिणीशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी.

अमृता: +91 9822214500  

वर्षा: +65 94554456 


सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software