• Home
  • गप्पांच्या विश्वात

गप्पांच्या विश्वात

  • Sun, August 11, 2024
  • 9:30 AM - 11:00 AM
  • TruCare Clinc Little India, 258 Serangoon Road, SG-218095
  • 58

Registration

  • MMS Members

Registration is closed

गप्पांच्या विश्वात


सर्व पालकांना नमस्कार,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आपल्या ११ ते १५ वयोगटातील मित्र-मैत्रिणींसाठी घेऊन येत आहे नवीन उपक्रम, "गप्पांच्या विश्वात". या उपक्रमाअंतर्गत आपण मुलांना उपयुक्त आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध विषयांवर रंगतदार गप्पांची सत्रे आयोजित करणार आहोत. विविध खेळ, संवाद कौशल्य, आवाजातले उतार-चढाव, चित्रकला, आरोग्य, अशा कित्तेक विषयांवर आपण रंगतदार गप्पांचं आयोजन करणार आहोत.

यातील पाहिलं सत्र आपण ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता ठेवलं आहे. विषय आहे "Voice Modulation". हे सत्र घेणार आहेत RJ वर्षा मंदार. हे पहिले सत्र आपण सर्व जुनिअर सभासदांसाठी खुले ठेवले आहे.

तर नक्कीच सर्व बाल मित्र-मैत्रिणींनी या नवीन उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा!

अधिक माहितीसाठी संपर्क:

सचिन जंगम : +65 8135 3425

शीतल धारूरकर : +65 8189 7501

दिवस - ११ ऑगस्ट २०२४

वेळ - सकाळी १०:०० ते ११:००

माध्यम - प्रत्यक्ष 

विशेष नोंद - फक्त मंडळाच्या विद्यमान सभासदांसाठी आयोजित केली आहे.

विशेष सहाय्य - TrueCare Clinic Singapore 


सस्नेह, 

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software