नमस्कार मंडळी,
विद्याधिपती व कलाधीश असणाऱ्या गणरायाच्या आगमनाचा आनंद आपण दरवर्षी विविधप्रकारे आपले कलागुण सादर करत साजरा करत असतो. ह्या वर्षीही महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी हा विविध गुणदर्शन सोहळा साजरा करण्याची सुसंधी घेऊन येत आहे.
निसर्गामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधील बऱ्याच गोष्टी, बऱ्याच व्यक्ती आपल्याला या ना त्या प्रकारे प्रेरणा देत असतात.. मग आपले मित्र-मैत्रिणी असोत, प्रसिद्ध/यशस्वी व्यक्तिमत्वे असोत,समाज वातावरण असो किंवा आजूबाजूचा परिसर असो... सगळं काही आपल्याला स्फूर्ती देत असतं..
तर यावर्षीच्या आपल्या VVG कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे "प्रेरणा".. या विषयाला साजेसं सांघिक सादरीकरण करणार आहेत आपल्या मंडळातील गुणी कलाकार..
कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणेः
तारीखः 14 सप्टेंबर 2024 (शनिवार)
वेळः सकाळी 10.30 वाजता
स्थळः GIIS Punggol
मग अजून वेळ न दवडता ह्या कार्यक्रमासाठीची तिकिटे लगेच काढा !.
Note:
1. Free Seating Arrangement in GIIS Punggol
2. Bento Box will be distributed after event (If booked online)
अधिक माहितीसाठी आपल्या समन्वयकांना संपर्क करा:
- अमृता: +919822214500 (WhatsApp)
- वर्षा: +65 9455 4456
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699