• Home
  • सहभागी वाचक - जे जे उत्तम साहित्यवाचन

सहभागी वाचक - जे जे उत्तम साहित्यवाचन

  • Sat, September 14, 2024
  • 4:00 PM
  • GIIS Punggol
  • 10

Registration


Registration is closed

जे जे उत्तम साहित्यवाचन संकल्पना - प्रेरणा

विद्याधिपती व कलाधीश असणाऱ्या गणरायाच्या आगमनाचा आनंद आपण दरवर्षी विविधप्रकारे आपले कलागुण सादर करत साजरा करत असतो. ह्या वर्षीही महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी हा जे जे उत्तम सोहळा साजरा करण्याची सुसंधी घेऊन येत आहे.

निसर्गामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधील बऱ्याच गोष्टी, बऱ्याच व्यक्ती आपल्याला या ना त्या प्रकारे प्रेरणा देत असतात.. मग आपले मित्र-मैत्रिणी असोत, प्रसिद्ध/यशस्वी व्यक्तिमत्वे असोत,समाज वातावरण असो किंवा आजूबाजूचा परिसर असो... सगळं काही आपल्याला स्फूर्ती देत असतं..

कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे "प्रेरणा".. या विषयाशी निगडित साहित्याचे वाचन आपण  करणार आहोत. 

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः

तारीखः 14 सप्टेंबर 2024

वेळः दुपारी 4 वाजता

स्थळः GIIS Punggol

नाव नोंदणीची अंतिम तारीख: 9 सप्टेंबर 2024

साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीखः 12 सप्टेंबर 2024

सहभागी वाचकांची मर्यादा : 15

नोंदणी: https://www.mmsingapore.org/event-5860444

  • कृपया नोंद घ्यावी की स्वलिखित, स्वसंकलित आणि स्वअनुवादित साहित्य स्वीकारले जाणार नाही. 
  • सादर करणाऱ्या प्रत्येक वाचकाला 5 ते 7 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
  • कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सभासद असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही ज्या साहित्याचे  वाचन  करणार आहात त्याची scanned copy  मंडळाला 12 सप्टेंबर पर्यंत पाठवणे जरुरी आहे. या साहित्याचे समीक्षण करून मंडळाने त्या साहित्यास अनुमती दिल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. 
  • सहभाग व सादरीकरणासंबंधित मंडळाचा निर्णय हा अंतिम असेल. 

तर मंडळी, मग वाट कसली पाहताय? लवकरात लवकर तुम्हाला आवडलेल्या अशा उत्तम साहित्यकृतीचा आनंद इतरांना देण्यासाठी वाचक म्हणून आपले नाव नोंदवा. कृपया नावनोंदणी लवकरात लवकर करावी, कारण वाचक संख्या मर्यादित आहे.

नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी खालील समन्वयकांना  संपर्क करावा 

सचिन: +65 8135 3425; वर्षा: +65 9455 4456

सस्नेह 

म. मं. सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software