• Home
  • शब्दगंध जानेवारी २०२५ आमंत्रण

शब्दगंध जानेवारी २०२५ आमंत्रण

  • Sat, January 25, 2025
  • 5:30 PM - 10:30 PM
  • 206 DEPOT ROAD #17-52 INTERLACE CONDOMINIUM, SINGAPORE 109697
  • 20

Registration


Register


शब्दगंध जानेवारी २०२५

आमंत्रण 


नमस्कार मंडळी,

वर्ष २०२५ करता अनेक शुभेच्छा..

या वर्षी शब्दगंध विशीत प्रवेश करत आहे. 

२०२५ नव वर्षात आपण सर्वांनी प्रवेश केला. समारंभ पूर्वक नववर्षाचे स्वागत ही केले. पण जर उगवणारा सूर्य तोच होता. वेळेचे चक्र तेच होते. मग फरक काय होता.

 २०२५ चे  वेगळेपण आपण घडवायचे आहे. नवं संकल्प मनात धरून. नव कल्पना निर्माण करून. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन. जिवाभावाच्या मंडळींबरोबर मराठीत गप्पा करून. 

जानेवारी महिन्याचे शब्दगंध म. मं. सिगापूर आयोजित आहे. आपली हजेरी जरूर कळवावी.

      

नवं वर्ष प्रवेशाकरता कशाला अमली मद्य 

साजरे करण्या श्रवण करावे मराठी पद्य   

मनातले नवं संकल्प पुरे करू  

मातृभाषेत संवादाची कास धरू        

(प्रसिद्ध कवी न. व. कालचक्रे यांचे मनःपूर्वक आभार)


वर्ष २०२५, जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांती व गणराज्य दिनानिमित्त आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा.....

जानेवारी २०२५ महिन्याचे शब्दगंध मेहफिलीचे यजमानपद महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यांनी स्विकारले आहे.   

ज्यांना प्रत्यक्ष कविता सादर करायची असेल त्यांनी स्वतःचे व सोबत येणाऱ्या व्यक्तीचे नाव कळवावे. यजमानांच्या आयोजना करता २३ जानेवारी २०२५ पर्यंत आपली नावे कळवावी ही विनंती. परदेशातून सहभागी कवी नेहमीप्रमाणे zoom वर कविता सादर करू शकतील. 

पत्ता - 206 DEPOT ROAD #17-52 INTERLACE CONDOMINIUM, SINGAPORE 109697

तारीख:  पंचवीस (२५) जानेवारी २०२५, शनिवार        

वेळ : सायंकाळी ५ वाजता (ही वेळ सर्वांनी पाळावी ही आवर्जून विनंती) 

विषय: 

१. प्रवेश  ..... (यजमान सुचित विषय)

२. सोबत जोडलेले चित्र..... (यजमान सुचित चित्र)

सर्वांनी आपली उपस्थिती  ममसिं संकेत स्थळावर कळवावी ही नम्र विनंती.

https://www.mmsingapore.org/event-6034287

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software