• Home
  • ऋतुगंध वसंत २०२६ ‘परीक्षा’ विशेषांक

ऋतुगंध वसंत २०२६ ‘परीक्षा’ विशेषांक

  • Sat, June 06, 2026
  • 1:30 PM - 4:30 PM
  • Online via Zoom

Registration


Register

ऋतुगंध वसंत २०२६ ‘परीक्षा’ विशेषांक  

डिजिटल अंक प्रकाशन आणि अभिवाचन (शब्दऋतू)

नमस्कार मंडळी,

लेखक आणि वाचक या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूशिवाय दुसरी बाजू अपूर्ण असते. आपले नाणे खणखणीत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही बाजूंची उपस्थिती महत्त्वाची असते.

‘ऋतुगंध-वसंत २०२६’ चा प्रकाशन समारंभ काही कारणांमुळे सध्या प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित करता येत नसल्याने यावेळी डिजिटल अंक प्रकाशित करतोय.

डिजिटल अंकाची लिंक : https://mmsrutugandha.wordpress.com/rutugandha-latest-edition/

तसेच लेखक आणि वाचक यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही ‘शब्दऋतू’ अभिवाचन कार्यक्रम आयोजित करत आहोत. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वाचकांना त्यांच्या स्वरचित लेख, कथा किंवा कवितेतील निवडक आणि महत्त्वाचा भाग सादर करायचा आहे.

दिवस: शनिवार, ६ जून २०२६

वेळ: दुपारी १.३० ते ४.३०

स्थळ: झूम

महत्त्वाचे:

  • ‘परीक्षा’ या विषयावरील स्वरचित कथा, लेख किंवा कवितेचे अभिवाचन करावे. सादर केलेला उतारा किंवा कविता ‘ऋतुगंध-वसंत २०२६’ या डिजिटल अंकात प्रकाशित असू शकतो किंवा नसूही शकतो.
  • प्रत्येक सहभागीने आपले अभिवाचन १० ते १५ मिनिटांच्या मर्यादेत ठेवावे.
  • वाचन करताना उच्चार स्पष्ट आणि प्रभावी असावेत.
  • वेळेच्या नियोजनानुसार या कार्यक्रमात जास्तीत जास्त १० वाचकांना सहभागी करून घेतले जाईल. त्यापेक्षा अधिक इच्छुकांना पुढील कार्यक्रमात संधी दिली जाईल.
  • अभिवाचनात सहभागी होणाऱ्या व्यतिरिक्त श्रोत्यांनीही कृपया या लिंकद्वारे नोंदणी करावी.
  • अभिवाचनासाठी नोंदणी केलेल्या वाचकांना आणि श्रोत्यांना एका आगळ्या प्रश्नपत्रिकेची लिंक पाठवण्यात येईल. तरी अभिवाचनापूर्वी हा ‘पेपर’ सोडवून आणावा ही विनंती!

सोबत दिलेल्या नोंदणी दुव्यावर आपले नाव लवकरात लवकर नोंदवा आणि या अभिवाचन कार्यक्रमात सहभागी व्हा.

नाव नोंदणीसाठी इथे क्लिक करा:

https://www.mmsingapore.org/event-6715590

सस्नेह,

ऋतुगंध समिती, महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर


Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software