नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या ‘संवाद’ मालिकेच्या पुढच्या सत्रासाठी आपणास मनःपूर्वक आमंत्रण.
या सत्रात आपल्या सर्वांच्या परिचयाचे आणि प्रथितयश आर्थिक सल्लागार श्री. मंदार पाध्ये यांच्याशी ‘आर्थिक नियोजन – आयुष्यभराचा प्रवास’ या विषयावर मुक्त संवाद होणार आहे.
पहिल्या पगारापासून ते निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास, गुंतवणूक, आर्थिक शिस्त, चांगल्या आर्थिक सल्लागाराची भूमिका आणि AI च्या युगातील बदल—या सर्व विषयांवर मंदार आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत.
आपण या संवादाचा भाग व्हावे, हीच अपेक्षा.
आपल्या या संवादाची वेळ आहे -
रविवार, दिनांक 2 ऑगस्ट 2026
दुपारी: 3:30 - 4.30
स्थळ: Function Room, The Clearwater Bedok Reservoir View, Singapore - 479232
समन्वयक - अजित वैद्य
नोंदणी करण्यासाठी कृपया खालील लिंकचा वापर करा:
सस्नेह,
म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699