• Home
  • जे जे उत्तम साहित्यवाचन

जे जे उत्तम साहित्यवाचन

  • Fri, September 18, 2026
  • 5:00 PM
  • 2 OWEN ROAD, Farrer Park, Singapore 218842
  • 14

Registration


Register


जे जे उत्तम साहित्यवाचन 

नमस्कार मंडळी,

“वाचन संस्कृती जपूया… साहित्याचा आनंद लुटूया!”

दरवर्षीप्रमाणे, गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून, आपल्या सर्वांच्या ज्ञानात, विचारात आणि आनंदात भर घालण्यासाठी “जे जे उत्तम” या साहित्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

यावर्षीच्या कार्यक्रमात कोणताही विशिष्ट विषय न घेता,  उत्तम साहित्याचे (कथा / कविता / लेख / साहित्यिक रचना) वाचन करण्यात येणार आहे.

वाचा • ऐका • विचार करा • साहित्याचा आनंद घ्या!

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणेः

तारीखः 18 सप्टेंबर 2026
वेळः सायं. 5 वाजता
स्थळः 2 OWEN ROAD, Farrer Park, Singapore 218842 (लिटल इंडिया येथील खुल्या प्रांगणातील गणेशोत्सव मंडपात)
नाव नोंदणीची अंतिम तारीखः 10 सप्टेंबर 2026
साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीखः 12 सप्टेंबर 2026
सहभागी वाचकांची मर्यादाः 15

नोंदणी: https://www.mmsingapore.org/event-6814894

कृपया नोंद घ्यावी:
• साहित्य आक्षेपार्ह नसावे (राजकीय / धार्मिक इत्यादी).
• हे सत्र सभासद, सभासदेतर तसेच लहान मुले (वय वर्षे १० पेक्षा पुढे) अशा सर्वांसाठी खुले आहे.
• सादर करणाऱ्या प्रत्येक वाचकाला 5 ते 7 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
• स्थानिक लेखकांच्या स्वलिखित साहित्याचेही स्वागत आहे.
• तुम्ही ज्या साहित्याचे वाचन करणार आहात, त्याची scanned copy पुढे दिलेल्या लिंक वर (Folder मध्ये)  12 सप्टेंबर 2026 पर्यंत upload करणे जरुरीचे आहे. कृपया scanned copy ला तुमचे नाव द्या. या साहित्याचे समीक्षण करून मंडळाने त्यास अनुमती दिल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

https://drive.google.com/drive/folders/1Y0FzfQgYHhU51mAEdh17tVrubhP5T1Ia?usp=sharing

• सहभाग व सादरीकरणासंबंधित मंडळाचा निर्णय अंतिम असेल.

तर मंडळी, मग वाट कसली पाहताय? लवकरात लवकर तुम्हाला आवडलेल्या अशा उत्तम साहित्यकृतीचा आनंद इतरांना देण्यासाठी वाचक म्हणून आपले नाव नोंदवा.

सर्व साहित्यप्रेमी, वाचनप्रेमी व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती!

अधिक माहितीसाठी खालील समन्वयकाशी संपर्क साधावा.
अजित वैद्य – 98807981

सस्नेह,
म. मं. सिं. कार्यकारिणी



Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software